धक्कादायक! दशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबाची बोट पलटी होऊन ११ जण बुडाले, ३ जणांचे मृतदेह हाती


हायलाइट्स:

  • अमरावतीमध्ये बोट पलटी होऊन ११ जण बुडाले
  • दशक्रियेसाठी ११ जण बोटीतून जात असताना अपघात
  • ३ जणांचे मृतदेह हाती

अमरावती : गणेशोत्सवाच्या दरम्यान अमरावतीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. जिल्ह्यातील बेनोडा शहीद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या श्री शेत्र झुंज येथे दशक्रिया विधी आटोपून फिरायला गेलेली अकरा जण एका बोटीत शिरले ही बोट बुडाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

ऐन गणेशोत्सवाच्या दरम्यान ही घटना घडल्यामुळे अमरावतीमध्ये शोककळा पसरली आहे. दशक्रियेसाठी ११ जण बोटीतून जात होते. पण नदीमध्ये पाणीपातळीत वाढ झाली असल्याने बोट पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. खरंतर, गेल्या अनेक दिवसांपासूनमध्ये पावसाने तुफान हजेरी लावली आहे. त्यामुळे नदी-नाले तुडुंब भरले आहेत. यामुळे बोट पलटी झाली.

cm uddhav thackeray: परप्रांतीयांची नोंद ठेवा; ते येतात कुठून, जातात कुठे याची माहिती ठेवा: मुख्यमंत्री
मिळालेल्या माहितीनुसार गाडेगाव येथील मटरे कुटुंबातील अकरा सदस्य दशक्रिया विधी आटपून आज सकाळी दहा वाजता च्या सुमारास वरूड कडे फेरफटका मारायला आले होते. यावेळी त्यांनी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदी नावेने जात होते. दरम्यान, अचानक नाव पलटी होऊन मोठा अनर्थ घडला. या घटनेत 11 जन बुडण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यामध्ये बहिण-भाऊ जावई यांचा समावेश असून सर्वांना जलसमाधी मिळाली असल्याची भीती वर्तविली जात आहे आतापर्यंत तीन मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले असून इतरांचा शोध घेणे सुरू आहे.

मुंबईत १८ वर्षीय तरुणीचा धक्कादायक मृत्यू, टूथपेस्ट ऐवजी चुकून ‘या’ विषारी औषधाने घासले दातSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: