Indian Coast Guard: रात्रीच्या काळोखात समुद्रात बुडता-बुडता ‘ध्रुव’नं वाचवले सात जणांचे प्राण


हायलाइट्स:

  • समयसूचकता आणि सतर्कतेमुळे मोहीम यशस्वी
  • दीवमध्ये घडली घटना
  • भारतीय तटरक्षक दलानं शेअर केला व्हिडिओ

दीव : भारतीय तटरक्षक दलाच्या सतर्कतेमुळे सात जणांचे प्राण वाचलेत. आव्हानात्मक परिस्थितीशी दोन हात करत भारतीय तटरक्षक दलानं भर समुद्रात एका बोटमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी रात्रीच्या काळोखात एक विशेष ऑपरेशन राबवलं. दीवमध्ये ही घटना घडलीय.

नैसर्गिक आव्हानांचा सामना करत काळोखात राबवण्यात आलेलं हे ऑपरेशन कॅमेऱ्यात कैद करण्यात आलंय. या व्हिडिओमध्ये एक हेलिकॉप्टर बोटमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना सुखरुपपणे तटावर पोहचवताना दिसत आहे.

भारतीय तटरक्षक दलानं सोशल मीडियावरून हा व्हिडिओ शेअर केलाय. ‘आव्हानात्मक वातावरणात एका धाडसी बचाव मोहिमेत भारतीय तटरक्षक दलाच्या स्वदेशनिर्मित अॅडव्हान्स लाईट हेलिकॉप्टरनं दीवजवळ अडकलेल्या ‘आयएफबी राम’मधून सात सदस्यांना सुखरुप बाहेर काढलं. सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत’, अशी माहिती देण्यात आलीय.

Quad Summit: अमेरिकेसहीत चार देशांच्या पहिल्या ‘क्वाड’ संमेलनात सहभागी होणार पंतप्रधान मोदी
Nitin Gadkari: ‘मुख्यमंत्री’ पदावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आपल्या पक्षाला टोला

मिळालेल्या माहितीनुसार, बोटमधून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तटरक्षक दलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरच्या सहाय्याने ही बचावमोहीम राबवण्यात आली. रात्रीच्या अंधारात विपरीत नैसर्गिक परिस्थितीत तटरक्षक दलाच्या पायलटसाठी ही मोहीम अत्यंत आव्हानात्मक ठरली. परंतु, समयसूचकता आणि सतर्कतेमुळे ही मोहीम यशस्वी ठरलीय.

Namanveer Singh: २८ वर्षीय भारतीय नेमबाजाचा बंदुकीच्या गोळीनं घेतला वेध, मृत्यूचं गूढ कायम
covid 19 india : करोनाने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना भरपाई; मार्गदर्शक सूचना जारी करा, सुप्रीम कोर्टाचे निर्देशSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: