मुंबई इंडियन्स संघात आला नवा स्टार; अफलातून कॅच घेऊन सर्वांना केले हैराण


मुंबई: आयपीएल २०२१च्या दुसऱ्या सत्राला १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील आठ संघातील खेळाडू सध्या युएईमध्ये दाखल होत आहेत. अनेक खेळाडूंनी सराव देखील सुरू केला आहे.

वाचा-विराट कोहली खरच थकला आहे का; वर्कलोडचा कामगिरीवर परिणाम होतोय!

दुसऱ्या सत्रातील पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघात होणार आहे. मुंबई इंडियन्सने २०२० मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. या वर्षी त्यांना जेतेपदाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. मुंबई इंडियन्सचा संघ सध्या गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर आहेत.

वाचा- पाकिस्तानला हाताशी धरून इंग्लंडने भारताला दिला मोठा झटका

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी दुसऱ्या सत्रासाठी जोरदार सराव सुरू केला आहे. नेट्समध्ये मुंबईचे खेळाडू सराव करतानाचा व्हिडिओ संघाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या सरावामध्ये मुंबईच्या एका खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबईच्या संघात अंतिम ११ मध्ये खेळणारे आणि राखीव फळीमध्ये बरेच स्टार खेळाडू आहेत. अशा स्टार खेळाडूंमध्ये एका युवा खेळाडूने सरावात अफलातून कामगिरी केली. युद्धवीर सिंग चरक असे या खेळाडूचे नाव असून त्याने सराव सत्रात एक्रोबेटिक फिल्डिंगकरून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

वाचा- Video: क्रिकेटच्या इतिहासात असे कधीच घटले नाही; चेंडू न टाकता ४ विकेट घेतल्या

फिल्डिंग कोच जेम्स पेमेंट हे मुंबईच्या खेळाडूंना त्यांचे स्किल्स सुधारण्यासाठी मदत करत आहेत. फिल्डिंग ड्रिल दरम्यान युद्धवीरने त्याच्या डाव्या बाजूला हवेत उडी मारून शानदार कॅच घेतला.

मुंबई इंडियन्सने या घटनेचा व्हिडियो सोशल मीडियावर शेअर केला आहे. २४ वर्षीय युद्धवीरने अफलातून असा कॅच घेतला. हैदराबादच्या या युवा खेळाडूने काल (१३ सप्टेंबर)रोजी वाढदिवस साजरा केला. मुंबई संघाने त्याला सोशल मीडियावरून शुभेच्छा देखील दिल्या.

१९ सप्टेंबर रोजी मुंबईची लढत चेन्नई विरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: