पंजशीरच्या मुद्यावर इराणचा इशारा; तालिबानने ठणकावले, म्हणाले…काबूल: तालिबान आणि इराणमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. पंजशीरमधून होत असलेल्या विरोधाचा बिमोड करण्यासाठी तालिबानने जोरदार कारवाई सुरू केली आहे. तालिबानच्या या कारवाईवर इराणने इशारा दिला होता. इराणच्या या भूमिकेवर तालिबानने आक्षेप घेतला असून इराणला ठणकावले आहे. पंजशीरचा मुद्दा हा आमचा अतंर्गत मुद्दा असल्याचे तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीनने म्हटले आहे. पंजशीरचा मुद्दा चर्चेतून सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. मात्र, कोणताही मार्ग नसल्याने सैनिकी कारवाई केली असल्याचे तालिबानने म्हटले.

सुहैल शाहीनने ‘सीएनएन न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, हा आमचा अंतर्गत मु्द्दा आहे. अफगाणिस्तानच्या जनतेला स्वतंत्र्य हवे आहे. कोणताही देश आमच्या अंतर्गत मुद्यांवर हस्तक्षेप करू नये अशी आमची इच्छा आहे. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानच्या वाढत्या प्रभावाबाबत बोलताना शाहीनने म्हटले की, कोणत्याही देशाचा प्रभाव, भूमिका नाही. शेजारच्या देशासोबत आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहे. त्यामुळे या शेजारचे देश आणि या क्षेत्रात असणाऱ्या देशांकडून अफगाणिस्तानच्या पुनर्निमाणासाठी सहकार्य हवे आहे. सहकार्याची अपेक्षा करणे म्हणजे त्या देशाचा आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप आहे, असा अर्थ होत नाही. हे आमचे धोरण नाही, असेही शाहीनने म्हटले.

पंजशीरवर इराण काय म्हटले होते?

पंजशीर खोऱ्यामध्ये नॅशनल रेझिस्टन्स फोर्स आणि तालिबानींमध्ये जोरदार संघर्ष झाला. तालिबानच्या मदतीसाठी पाकिस्तानच्या हवाई दलाने हवाई हल्लेही केले असल्याचे म्हटले गेले. पंजशीर खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या कारवाईवरून इराणला तालिबानला इशारा दिला होता. तालिबानने लक्ष्मण रेषा ओलांडू नये असे इराणने म्हटले होते. पंजशीरमध्ये पाकिस्तानच्या हस्तक्षेपाची इराणने चौकशी सुरू केली आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: