अमेरिकेचा अफगाणिस्तानला मदतीचा हात; ६४ दशलक्ष डॉलरची घोषणा


वॉशिंग्टन: अफगाणिस्तानमध्ये तालिबानने अंतरिम सरकार स्थापन केल्यानंतर अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधील नागरिकांची मदत करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेकडून अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी ६४ दशलक्ष डॉलरच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

‘टोलो न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्र् संघात अमेरिकेचे राजदूत लिंडा थॉम्पसन-ग्रीनफिल्ड यांनी ही आर्थिक मदत मानवीय दृष्टीकोणातून देणार असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर आहे. अशा स्थितीत अमेरिकेने मानवतेच्या दृष्टीने ६४ दशलक्ष डॉलरची मदत देण्यात येणार आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती लक्षात घेता भविष्यात आणखी मदत देण्यावरही विचार केला जाऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Video तालिबानचा दावा: सालेह यांच्या घरातून मिळाले ४८ कोटी रुपये, सोन्याच्या विटा!
अमेरिकेच्या आधी चीननेदेखील अफगाणिस्तानला मदत करण्याची घोषणा केली आहे. चीनने ३१ दशलक्ष डॉलरची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. यामध्ये अन्नधान्य आणि करोना लशीचाही समावेश आहे. अंतरिम सरकारकडून अफगाणिस्तानमधील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी ही मदत आवश्यक असल्याचे चीनने म्हटले होते.

अफगाणिस्तान: तालिबान सरकारच्या घोषणेनंतर ‘या’ देशाच्या शिष्टमंडळाचा दौरा
चीनने अफगाणिस्तानला केलेल्या मदतीचा हा पहिला टप्पा असल्याचे म्हटले जाते. तालिबानने अफगाणिस्तानमधील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत असेही चीनने म्हटले होते.

बायडन म्हणाले, तालिबान आणि त्याच्या तीन मित्रांच्या वाटचालीवर आमचंही लक्ष!
अमेरिकेने अफगाणिस्तानमधून माघारीची घोषणा केल्यानंतर चीनने तालिबानशी जवळीक साधण्यास सुरुवात केली. तर, दुसरीकडे तालिबानलाही मोठ्या देशाच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. तालिबानी शिष्टमंडळाने चीनमध्ये चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबतही चर्चा केली होती.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: