भारत-पाकिस्तान सामना होणार… पीसीबीच्या अध्यक्षांनी केले हे मोठे विधान


नवी दिल्ली : गेल्या बऱ्याच वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट मालिका झालेली नाही. पण पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्षपद स्विकारल्यावर माजी क्रिकेटपटू समालोचक रमीझ राजा यांनी भारताबरोबरच्या मालिकेबाबत आता एक मोठे वक्तव्य केले आहे.

भारत-पाकिस्तान मालिकेबाबत रमीझ राझा म्हणाले की, ” राजकारणाचा फटका हा सध्याच्या घडीला खेळाला बसत आहे. बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत भारत सरकार परवानगी देत नाही तोपर्यंत पाकिस्तानविरुद्ध ते मालिका आयोजित करू शकत नाहीत. माझ्यामते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिका होऊच शकत नाही, असे नाही. ही मालिका खेळवली जाऊ शकते, पण सध्याच्या घडीला तरी ही गोष्ट डेल असे मला वाटत नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला मी भारत-पाकिस्तान मालिकेबाबत कोणताच विचार करत नाही. भविष्यात काही कालावधी गेल्यावर मात्र यावर तोडगा काढला जाऊ शकतो. मी सध्या पाकिस्तानच्या स्थानिक क्रिकेटवर सर्वात जास्त लक्ष देण्याचे ठरवले आहे. कारण स्थानिक क्रिकेट ही माझी प्राथमिकता आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मला ही महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. बरीच महत्वाची कामं मार्गी लावायची आहेत. त्यामुळे या घडीला मी भारत-पाकिस्तान मालिकेचा विचार करणार नाही.”

पाकिस्तान क्रिकेटसाठी आजचा दिवस फार महत्वाचा होता. कारण आजच्या दिवशी पीसीबी अध्यक्षांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी पाकिस्तानचे प्रशिक्षकही जाहीर करण्यात आले. ट्वेन्टी-२० विश्वचषक डोळ्यापुढे ठेवून संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी आता ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनची निवड केली आहे. हेडनकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या संघातही हेडनचा समावेश होता. त्यामुळे हा ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी आता पाकिस्तानने हेडनची मदत घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी आता व्हेरनॉन फिलँडरचीही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाने आता ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाकि्तानचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: