रद्द झालेल्या कसोटीमुळे ECB नाराज; BCCIने दिली मोठी ऑफर


नवी दिल्ली: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि अखेरची कसोटी रद्द झाल्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड तसेच खेळाडू कशा पद्धतीने नाराज झाले आहेत हे गेल्या काही दिवसांपासून सर्वांना दिसत आहे. रद्द झालेल्या कसोटी संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला गेला नाही. ही कसोटी पुढील वर्षी जुलै महिन्यात भारताच्या इंग्लंड दौऱ्या दरम्यान होईल अशी चर्चा आहे.

वाचा-पाकिस्तानला हाताशी धरून इंग्लंडने भारताला दिला मोठा झटका

कसोटी रद्द करण्याच्या वेळी बीसीसीआयने इंग्लंड बोर्डाला कसे तरी मनवले. पण त्यांची नाराजी अद्याप गेलेली नाही. ईसीबीची नाराजी दूर करण्याचे सर्व प्रयत्न बीसीसीआय करत आहे. करोनामुळे इंग्लंड क्रिकेटची अवस्था खराब आहे. या नाराजी मागे ते एक कारण असल्याचे बोलले जात आहे. बीसीसीआयची देखील इच्छा आहे की इंग्लंड बोर्डाचे आर्थिक नुकसान होऊ नये. यामुळेच बीसीसीआयने त्यांना एक मोठी ऑफर दिली आहे.

वाचा- Inside Story: रोहित शर्माकडे कर्णधारपद देण्यास कसा काय तयार झाला विराट कोहली

बीसीसीआयने आता ईसीबीला पाचव्या कसोटीच्या बदली भविष्यात दोन टी-२० सामने खेळण्याची ऑफर दिली आहे. याचा अर्थ भविष्यात एक कसोटी खेळण्या ऐवजी दोन टी-२० सामने व्हावेत अशी बीसीसीआयची इच्छा आहे. अर्थात यासाठी ब्रॉडकास्टर देखील राजी झाले पाहिजेत. ज्यांनी पाचव्या कसोटीसाठी २५ मिलियन पाउंड दिले होते.

वाचा- विराट कोहली विरुद्ध रोहित शर्मा: फक्त IPL नाही, वनडे आणि टी-२० मध्ये हिटमॅन भारी

टेलीग्राफ वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, या शिवया कॉपोरेट, तिकीट, फूड आणि ड्रिंक आदीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर देखील प्रश्न चिन्ह आहे. या माध्यमातून १० मिलियन पाउंड इतकी कमाई होते. ही रक्कम दोन टी-२० सामन्यातून होणाऱ्या उत्पन्नापेक्षा फार अधिक आहे.

वाचा- विराट कोहली कर्णधारपद सोडणार का? BCCIने दिले उत्तर

पुढील वर्षी भारत इंग्लंडमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० साम्यांची मालिका खेळणार आहे. या लढती जुलै महिन्यात होणार आहेत. कसोटी मालिकेत भारत २-१ने आघाडीवर होता. आता मालिका कोणी जिंकली याचा निर्णय ईसीबीने आयसीसीला घेण्यास सांगितले आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: