करोना पसरवणाऱ्या रवी शास्त्रींवर बीसीसीआय कोणती कारवाई करणार, सौरव गांगुली म्हणाला…


नवी दिल्ली : भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना पहिल्यांदा करोना झाला आणि त्यानंतर तो संघात पसरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भारताला इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामनाही रद्द करावा लागला. रवी शास्त्री यांनी आपल्या पुस्तकाचे प्रकाशन करताना बीसीसीआयची परवानगी घेतली नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे भारतीय संघात करोना पसरवणाऱ्या रवी शास्त्री यांच्यावर बीसीसीआय नेमकी कोणती कारवाई करणार, याबाबत गांगुली यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

रवी शास्त्री यांच्याबाबत गांगुली नेमकं काय म्हणाला, पाहा…
या सर्व प्रकरणाबाबत गांगुलीने म्हटले आहे की, ” प्रत्येक व्यक्तीला काही गोष्टी करण्याचा अधिकार आहे. तुम्ही कोणालाही एका रुममध्ये बंद करून ठेवू शकत नाही. हॉटेलची खोली ते क्रिकेटचं मैदान एवढंच तुमचं आयुष्य असू शकत नाही. प्रत्येक माणसाला जसा जगण्याचा अधिकार आहे, तसाच त्यांना माणसाबरोबर राहण्याचाही अधिकार आहे. आता दादागिरी या सिनेमाच्या शुटींगच्या जागी मी गेलो होतो, तिथे बरीच लोकं होती. सर्वांनी करोनाची लस घेतली होती, पण कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्याचबरोबर कोणत्या व्यक्तीला काय झालंय, हे आपल्यालाही माहिती नसतं. त्यामुळे रवी शास्त्री यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.”
रवी शास्त्री यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर भारतीय संघात करोनाचा शिरकाव झाला. याबाबत गांगुली यांनी तर शास्त्री यांना क्लीन चीट दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता शास्त्री यांच्यावर कोणतीही कारवाई बीसीसीआय करणार नाही, असं दिसत आहे. काही जणांच्या मते काही दिवसांमध्येच शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कालावधी संपत आहे. त्यामुळे आता उगाच कारवाईचा बडगा उगारण्यात काहीच अर्थ नसल्याचे बीसीसीआयकडून दिसत आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर शास्त्री यांचा प्रशिक्षपदाचा कालावधी संपत आहे. त्यानंतर त्यांना या पदापासून दूर करण्यात येऊ शकते. त्यामुळे बीसीसीआय सध्या तरी शास्त्री यांच्यावर कारवाई करून कोणतीही जोखीन उचलणार नसल्याचेच दिसत आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: