Video तालिबानचा दावा: सालेह यांच्या घरातून मिळाले ४८ कोटी रुपये, सोन्याच्या विटा!


काबूल: तालिबानच्या सत्तेला आव्हान देणाऱ्या पंजशीरच्या राज्याच्या मोठ्या भागावर तालिबानने ताबा मिळवला आहे. तालिबानी फौजांकडून विद्रोही नेत्यांच्या ठिकाणांवर छापा मारला जात आहे. अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांच्या घरातून ६.५ दशलक्ष डॉलर (जवळपास ४८ कोटी रुपये) इतकी रोकड सापडली आहे. सालेह यांच्या घरातून सोन्याच्या विटाही सापडल्याचा दावा तालिबानने केला आहे.

तालिबानने एक व्हिडिओही जारी केला आहे. यामध्ये तालिबानी नोटांची बंडले एका बॅगेत भरत असल्याचे दिसत आहे. नोटांच्या बंडलांजवळच सोन्याच्या विटादेखील दिसत आहेत. तालिबानचा हा दावा खरा असल्यास पंजशीरमधील विद्रोही सैनिकांसाठी हा धक्का असणार आहे. याआधी पंजशीरमध्ये शिरलेल्या तालिबानींनी अमरुल्ला सालेह यांच्या घरावरही ताबा मिळवला होता. सालेह यांच्या ग्रंथालयात बसून काही फोटोही प्रसिद्ध करण्यात आली होती.

तालिबानकडून महिलांना शिक्षण घेण्यास परवानगी, पण…

अफगाणिस्तानचे ४६ एअरक्राफ्ट परत द्या; तालिबानचा ‘या’ शेजारी देशावर दबाव
अमरुल्लाह सालेह यांच्या भावाची हत्या

पंजशीरमध्ये तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अमरुल्लाह सालेह आणि अहमद मसूद हे सुरक्षित स्थळी गेले असल्याचे म्हटले जात आहे. पंजशीर खोऱ्यात अजूनही तालिबानसोबत लढाई सुरू आहे. तालिबानींनी पंजशीरच्या लढाईत अमरुल्लाह सालेह यांचा भाऊ रोहुल्लाह अजीजी यांनादेखील ठार केले आहे. तालिबानींनी रोहुल्ला यांचा मृतदेहदेखील दफन करण्यास मनाई केली होती. रोहुल्ला हे नॅशनल रेजिस्टन्स फोर्सच्या एका युनिटचे कमांडर होते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: