तालिबानकडून महिलांना शिक्षण घेण्यास परवानगी, पण…


काबूल: अफगाणिस्तानमध्ये नव्याने स्थापन झालेल्या तालिबान सरकारने महिलांच्या शैक्षणिक धोरणाची रविवारी घोषणा केली. यानुसार मुलींना विद्यापीठात पदव्युत्तर स्तरापर्यंत शिक्षण घेता येईल. परंतु विद्यार्थी व विद्यार्थिनींचे वर्ग वेगवेगळे असतील आणि विद्यार्थिनींना वर्गात इस्लामी रिवाजानुसार पेहराव (हिजाब) करावा लागेल, अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री अब्दुल बकी हक्कानी यांनी रविवारी दिली. एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.

१९९०च्या दशकातील तालिबान राजवट महिलांबाबत कमालीची असहिष्णू असल्याने यावेळी त्यांच्या धोरणात काय बदल झाले आहेत याकडे जगातील अनेक देशांचे लक्ष आहे. तालिबानच्या पूर्वीच्या राजवटीत मुलींच्या शिकण्यावरच नव्हे तर सार्वजनिक वावरावरही बंदी होती. मात्र आमच्या महिलाविषयक दृष्टिकोनात आता बदल झाला आहे हे सुचविण्याचा प्रयत्न या या नव्या धोरणात केल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानने गरळ ओकली; भारतात ISIS चे प्रशिक्षण केंद्र सुरू असल्याचा आरोप

‘मुलींना विद्यापीठात पदव्युत्तर स्तरापर्यंत शिक्षण सुरू ठेवता येईल. मात्र त्यांचे व मुलांचे वर्ग वेगवेगळे असतील. मुला-मुलींच्या एकत्रित शिक्षणास आमची परवानगी नाही. तसेच, विद्यार्थिनींना धार्मिक पद्धतीनुसार पेहराव करावा लागेल. शिकताना हिजाब परिधान करणे त्यांच्यासाठी अनिवार्य असेल,’ असे हक्कानी म्हणाले. मात्र हिजाब म्हणजे केवळ डोक्यावरून स्कार्फ की पूर्ण बुरखा हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

तालिबानचा शिक्षणमंत्री म्हणतो, कशाला हव्यात डिगऱ्या? त्याच्याशिवाय आम्ही इथंवर आलोय!

पंतप्रधान जागतिक दहशतवादी, गृहमंत्री मोस्ट वॉन्टेड; तरीही तालिबान सरकारला मान्यता मिळणार?
नव्याने उभारणी करणार

कालचक्र उलट फिरवून आम्ही राज्य करू इच्छित नाही. सध्या जे अस्तित्वात आहे त्यावर आम्हाला नव्याने उभारणी करायची आहे, असेही हक्कानी यांनी सांगितले. महिलांच्या शैक्षणिक धोरणाबाबत तालिबान राजवटीने काहीशी लवचीकता दाखवली असली तरी आपल्या मंत्रिमंडळात मात्र त्यांनी एकाही महिलेस स्थान दिलेले नाही.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: