ब्राझीलमध्ये करोना मृतांची संख्या पाच लाखांवर; विरोधकांचे आंदोलन


हायलाइट्स:

  • ब्राझीलमध्ये करोनाच्या बळींच्या वाढत्या संख्येमुळे चिंता
  • करोना बळींची संख्या पाच लाखांहून अधिक
  • ब्राझील सरकारच्या अपयशाविरोधात विरोधकांचे आंदोलन

रिओ दि जानेरो: दक्षिण अमेरिकेत करोना संसर्गाचे थैमान सुरू आहे. ब्राझीलमधील करोनामृत्यूंच्या संख्येने पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. या पार्श्वभूमीवर ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोलसोनारो यांना देशातील करोना संसर्ग रोखण्यात अपयश आल्याचा आरोप करून विरोधकांनी देशभरात निदर्शने केली.

ब्राझीलमध्ये आतापर्यंत १२ टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. सुमारे २१ कोटी लोकसंख्येच्या ब्राझीलमध्ये दररोज एक लाख नवीन करोनाबाधित रुग्ण आढळत असून, दररोज दोन हजार मृत्यू होत आहेत. लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय, तसेच अध्यक्ष बोलसोनारो यांनी चुकीच्या उपचारपद्धतीला दिलेले प्रोत्साहन यामुळे देशात करोनामृत्यू वाढल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे.

चांगली बातमी ! करोनाची दुसऱ्यांदा बाधा होण्याचा धोका कमी असल्याचा दावा

रिओ दि जानेरो येथे हजारो नागरिकांनी एकत्र येऊन सरकारच्या कामकाजाचा निषेध केला. ‘गेट आउट बोलसोनारो’, ‘गव्हर्न्मेंट ऑफ हंगर अँड अनएम्प्लॉयमेंट’ अशा घोषणा लिहिलेले झेंडे निदर्शकांनी फडकावले. ‘करोनामुळे ब्राझीलला मोठा फटका बसला आहे. ब्रासिलियासह विविध राज्यांत सरकारविरोधात मोर्चे काढण्यात आले. ब्राझीलमधील डाव्या विरोधी पक्षांनी या आंदोलनाची हाक दिली होती. साओ पावलो येथे निदर्शकांनी आकाशात लाल फुगे सोडून करोनासाथील मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

वाचा: अमेरिका विकसित करणार करोनाविरोधात औषधी गोळ्या; अब्जावधींची तरतूद

दरम्यान, सरकारविरोधात रस्त्यावर निदर्शने करून विरोधी पक्षदेखील सार्वजनिक आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत, असे निरीक्षण साओ पावलो विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक लिएंद्रो कोन्सेंटिनो यांनी सांगितले.

वाचा: चिंता वाढली! डेल्टानंतर आता ‘या’ नव्या वेरिएंटचा धोका; २९ देशांमध्ये फैलाव

आफ्रिकेत लसीकरणाचे नियोजन

दक्षिण आफ्रिकेतील पाच लाख ८२ हजार शिक्षकांचे चौदा दिवसांत लसीकरण करण्याची महत्त्वाकांशी मोहीम आखण्यात आली आहे. प्राथिमिक शिक्षण मंत्री अँजी मोटशेक्गा यांनी २३ जूनपासून सुरू होणाऱ्या या मोहिमेची माहिती दिली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना करोना संसर्ग होऊ लागल्याने गेल्या आठवड्यात शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा: ब्रिटनमध्ये डेल्टा वेरिएंटचा हाहा:कार; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा

अमेरिकेकडून तैवानला लस

अमेरिकेने तैवानला मॉडर्ना लशीचे २५ लाख डोस पाठवले आहेत. हवाईमार्गे लशींचा हा साठा पाठवण्यात आल्याचे अमेरिकी दूतावासाने सांगितले आहे. मित्र म्हणून तैवानला ही मदत पाठवण्यात येत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. यापूर्वी अमेरिकेने तैवानला साडेसात लाख डोस देण्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर यात तिप्पट वाढ करून २५ लाख डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: