bhupendra patel sworn in as new chief minister of gujarat : भूपेंद्र पटेलांनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, PM मोदी म्हणाले…


गांधीनगरःभूपेंद्र पटेल यांनी आज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ( bhupendra patel sworn in as new chief minister of gujarat ) घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी ( bhupendra patel ) भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. भूपेंद्र पटेल हे राज्याचे १७ वे मुख्यमंत्री झाले आहे. पक्षाने नियोजनानुसार आज फक्त भूपेंद्र पटेल यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाला. अमित शहांनी पुष्पगुच्छ देऊन व्यासपीठावर भूपेंद्र पटेल यांचं अभिनंदन केलं. तर पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून भूपेंद्र पटेल यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

आता भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागेल याची उत्सुकता आहे. भाजपकडून मंत्रीपदासाठी नेत्यांची नाव निश्चित झाल्यानंतर येत्या काही दिवसांत पटेल यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचाही शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी उपस्थित होते. भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अमित शहा यांनी त्यांचं मंचावर अभिनंदन केलं आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या. यासोबत भाजपच्या इतर मुख्यमंत्र्यांनीही भूपेंद्र पटेल यांचं अभिनंदन केलं.

गुजरातचे मुख्यमंत्रीपद हुकले; नितीन पटेलांचे डोळे डबडबले; भावुक होत म्हणाले…

पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले…

गुजरातचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल भूपेंद्र पटेल यांचे अभिनंदन. मी भूपेंद्रभाई यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. पक्षाची कामं असोत किंवा प्रशासनाची किंवा जनतेची सेवा करण्याची कामं असोत भूपेंद्रभाई हे झोकून देऊन काम करतात. यामुळे भूपेंद्रभाईंच्या नेतृत्वात गुजरातचा आणखी जोमाने विकास होईल हे नक्की, असं पंतप्रधान मोदी ट्वीटमध्ये म्हणाले. पंतप्रधान मोदींनी गुजरातीसह इंग्रजीमध्ये ट्वीट करून भूपेंद्र पटेलांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

gujarat flood : मुसळधार पावसाने झोडपलं; गुजरातच्या राजकोट, जामनगर जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती

PM मोदींनी केले रुपानींचे कौतुक…

विजय रुपानी आपल्या ५ वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात गुजरातसाठी अथक परिश्रम घेतले. समाजातील सर्व घटकांसाठी त्यांनी काम केलं. अनेक नागरिकांना त्यांनी जोडलं. जनतेच्या सेवेसाठी ते पुढच्या काळात अशा प्रकारे काम करत राहतील हा आपल्याला विश्वास आहे, असं पंतप्रधान मोदींनी आणखी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: