अनिल देखमुख हाजिर हो! ईडीची मोठी कारवाई, देशमुखांना शोधण्यासाठी CBI ची मदत


हायलाइट्स:

  • अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढणार
  • ईडीची मोठी कारवाई
  • देशमुखांना शोधण्यासाठी मागितली CBI ची मदत

मुंबई : अंमलबजावणी संचालनालय-ईडीने (Enforcement Directorate-ED) आता महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर कारवाई अधिक तीव्र केली आहे. सध्या अनिल देशमुख हे १०० कोटी वसुली आणि मनी लाँडरिंग प्रकरणात आरोपांचा सामना करावा लागत आहे. ईडीने अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (Central Bureau of Investigation- CBI) मदत मागितली आहे. अनिल देशमुख यांना वारंवार समन्स देऊनही ईडी चौकशीसाठी हजर न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

याआधीही देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि सीबीआय निरीक्षक अभिषेक तिवारी यांना न्यायालयाने दोन दिवसांची सीबीआय कोठडी दिली होती. देशमुख यांच्याविरुद्धच्या तपासाचा अहवाल लीक केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्या लीक झालेल्या अहवालाच्या आधारे अनिल देशमुख निर्दोष असल्याची बातमी पसरवली गेली होती. सीबीआयने या दोघांना गेल्या आठवड्यात अटक केली होती. तिवारी देशमुखांचे वकील डागा यांच्या संपर्कात होते आणि त्यांना सीबीआय अहवालाशी संबंधित माहिती लीक करत होते.
somaiya accuses hasan mushrif: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेकडो कोटींचा घोटाळा केला; किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप
अनिल देशमुख हाजिर हो…

वारंवार समन्स देऊनही अनिल देशमुख ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहत नाहीयेत. यामुळे मिळालेल्या माहितीनुसार, आता ईडी आणि सीबीआय मिळून देशमुखांना शोधण्यासाठी राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे. याआधीही, ईडीने अनिल देशमुख यांच्याशी संबंधित नागपूर आणि मुंबईच्या १३-१४ ठिकाणी छापे टाकले होते.

अनिल देशमुख कुठे बेपत्ता, ते का गायब आहेत?

अनिल देशमुख यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा देताना सांगितले होते की, सीबीआय आणि ईडीकडून होणाऱ्या तपासाला ते पूर्ण सहकार्य करणार. पण राजीनामा दिल्यानंतर त्यांनी युटर्न घेतल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर त्यांनी तपास यंत्रणांना कधीच सहकार्य केलं नाही. आरोग्य, करोना आणि वयाचा हवाला देत समन्सच्या प्रतिसादात ते कधीही दिसले नाही. कधीकधी वकिलामार्फत उत्तर पाठवण्यात आले.

पण देशमुख यांनी त्यांच्या अटकेविरोधात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात केलेले प्रयत्न अपयशी ठरले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने देशमुख यांचा युक्तिवाद फेटाळून लावला आहे. यानंतर अनिल देशमुख कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही. याचा तपास आता सीबीआय घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Weather Alert : राज्यावर आस्मानी संकट, आजपासून ‘या’ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशाराSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: