gujarat flood : मुसळधार पावसाने झोडपलं; गुजरातच्या राजकोट, जामनगर जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती


गांधीनगरः गुजरातमध्ये एकीकडे नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होणार असताना दुसरीकडे राज्यातील राजकोट आणि जामनगर जिल्ह्यांनात मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. राजकोट आणि जामनगर जिल्ह्यात मध्य रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे या दोन जिल्ह्यांमधील अनेक तालुक्यांमध्ये आणि गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्या, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे.

राजकोट जिल्ह्यातील धोराजी, पदाधारी आणि गोंदळ तालुक्यांना सर्वाधक फटका बसला आहे. या तालुकांमधील अनेक गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. पुराचं पाणी घरांमध्ये शिरलं आहे. अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. मोठ्या प्रमाणावर गुरेही आणि वाहनं पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं बोललं जातंय. तर जामनगर जिल्ह्यातील कलावाड आणि ध्रोल तालुक्यांनाही मुसळधार पावसाने झोडपलं आहे. या तालुक्यांमधील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जामनगरमधील खिमराना गावात भीषण पूरस्थिती असून गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. तसंच अलियाबडा गावालाही पुराने वेढा घातला आहे.

bhupendra patel : भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री, शपथविधीला अमित शहा उपस्थित

मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे राजकोटच्या जिल्हाधिकाऱ्याने शाळा आणि महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी घोषित केली आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे राजकोट आणि जामनगर जिल्ह्यात मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. पुराचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

shrimant patil : काँग्रेस सोडताना भाजपने पैशांची ऑफर दिली होती, श्रीमंत पाटील यांचा दावा

दरम्यान, हवामान विभागाने गुजरातसह महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या राज्यांमधील काही भागांमध्ये १३, १४ आणि १५ सप्टेंबरदरम्यान जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: