लसीकरणाला वेग!; जपानमध्ये ५० टक्के लोकसंख्येचे करोना लसीकरण


टोकियो: जपानमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येचे संपूर्ण करोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे, अशी माहिती जपान सरकारने रविवारी दिली. फेब्रुवारीच्या मध्यापासून जपानमध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लशींचा पुरवठा कमी असल्याने मोहीम मंदावली होती. मात्र, मे महिन्यानंतर लशीच्या उत्पादनाने वेग घेतला आणि आता जपानमध्ये दररोज दहा लाख डोसचे उत्पादन केले जात आहे.

करोना प्रतिबंधक उपायोजनांचा प्रभार असलेले जपानचे अर्थमंत्री युसुतोशी निशिमुरा म्हणाले, ‘सप्टेंबरअखेरपर्यंत देशातील ६० टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये करोना प्रतिबंधात्मक निर्बंध शिथिल करण्यासाठीच्या आराखड्याबाबत सरकार अभ्यास करणार आहे. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवास, समारंभ आणि मोठ्या कार्यक्रमांना एकत्र येण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

करोना: कापडी मास्क किती काळ प्रभावी? संशोधनात ‘हा’ मोठा दावा
जपानमध्ये करोना महासाथ सुरू असताना ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिकचे सामने आयोजित केल्याबद्दल सरकारवर टीका सुरू होती. ऑलिम्पिक सामन्याच्या पूर्वी टोकियोसह इतर महत्त्वांच्या शहरात करोना निर्बंध लागू करण्यात आले होते.

जगभरातील रुग्णसंख्या २२ कोटी ४० लाख

जगभरातील करोनाबाधितांची संख्या २२ कोटी ४० लाखांवर पोहोचली आहे, तर जगातील करोनामृत्यूंची संख्या चार कोटी ६२ लाख झाली आहे. त्याच वेळी जगभरात ५ अब्ज ६५ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाकडील रविवारी सकाळपर्यंत अद्ययावत झालेली ही आकडेवारी आहे. जगातील करोना रुग्णांची एकूण संख्या २२ कोटी ४२ लाख १५ हजार ६७५ इतकी झाली आहे. अमेरिकेत करोनाबाधितांची एकूण संख्या चार कोटी ९ लाख २० हजार ९२२ इतकी झाली आहे.

अमेरिका: शाळा सुरू होताच मुलांना करोनाची लागण!; सात लाखांहून अधिक बाधित

‘या’ चिमुकल्या देशाची कमाल; दोन वर्षाच्या मुलांचे करोना लसीकरण
बांगलादेशात शाळा सुरू

बांगलादेशमध्ये ५४३ दिवसांनंतर रविवारी शाळा सुरू झाल्या. करोना निर्बंधांमुळे बांगलादेशातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. लसीकरणाने वेग घेतल्यानंतर सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशातील हजारो मुलांनी रविवारी शाळेत हजेरी लावली.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: