विराट हे वागणं बरं नव्हं, विकेट मिळत असताना मैदानात करत होता ही गोष्ट; व्हिडीओ झाला व्हायरल…


साउदम्प्टन: भारताचा कर्णधार विराट कोहली हा मैदानात चांगलाच आक्रमक असतो, हे सर्वांनाच माहिती आहे. पण भारतीय संघाला जेव्हा विकेट मिळत नव्हती तेव्हा विराट मैदानात कर्णधाराला शोभणार नाही, असे कृत्य करत होता. विराटचा हा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.

भारतीय संघाचा पहिला डाव २१७ धावांमध्येच आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी दमदार फलंदाजी केली. त्यामुळेच भारताला न्यूझीलंडच्या सलामीवीरांना बऱ्याच षटकांमध्ये बाद करता आले नव्हते. त्यावेळी एखादा कर्णधार गोलंदाजांना मार्गदर्शन करु शकतो, पण कोहली यावेळी अशी कोणतीच गोष्ट करताना पाहायला मिळाला नाही. भारताला जेव्हा विकेट मिळत नव्हती तेव्हा कोहली स्लीपमध्ये नाचत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काही जणं कोहलीवर चांगलेच नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे.

जेव्हा संघाला विकेट मिळत नसते तेव्हा कर्णधार गोलंदाजीमध्ये बदल करताना दिसतो किंवा गोलंदाजांना मार्गदर्शन करताना दिसतो. पण कोहली यावेळी यामधील कोणतीही गोष्ट करताना दिसला नाही. उलट कोहली यावेळी मैदानात नाचत असल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी कोहलीवर बरेच चाहते निराश झाले आहेत. विकेट मिळाल्यावर सेलिब्रेशन करणे ही वेगळी गोष्ट असते. पण विकेट मिळत नसताना कोहलीने केलेली ही गोष्ट बऱ्याच जणांना आवडलेली नाही.

कोहलीने केली ही मोठी चुक
कोहलीने आज एक मोठी चुक केली. भारतीय संघात सध्याच्या घडीला दोन्ही स्विंगसह वेगवान गोलंदाजी करणारा खेळाडू मोहम्मद शमी आहे. पण कोहलीने यावेळी गोलंदाजीची सुरुवात इशातं शर्मा आण जसप्रीत बुमरा यांच्याकडून केली. यावेळी इशांतने गोलंदाजी करताना ऑफ स्टम्पच्या भरपूर बाहेर चेंडू टाकले, त्यामुळे त्याला विकेट मिळवण्यात अपयश आले. पण त्यावेळी जर शमीच्या हाती चेंडू दिला असता तर भारतीय संघाला लवकर विकेट मिळवण्याची दाट शक्यता होती. कारण शमी हा फलंदाजानुसार गोलंदाजी करतो. त्याचबरोबर तो फलंदाजाच्या शरीराच्या जवळ जास्त गोलंदाजी करतो आणि त्यावेळी विकेट मिळण्याची जास्त संधी असते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: