औरंगाबाद हादरलं! धारदार शस्त्राने १८ वर्षीय तरुणाची हत्या, कारणही धक्कादायक


हायलाइट्स:

  • रविवारी रात्री औरंगाबाद हादरलं
  • धारदार शस्त्राने १८ वर्षीय तरुणाची हत्या
  • कारणही धक्कादायक

औरंगाबाद : राज्यात गुन्ह्यांच्या घटना वारंवार समोर येत आहे. ऐन गणेशोत्सवातही हत्येच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अशात औरंगाबादमध्येही एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांचनवाडी भागातील एका वाईन शॉपच्या समोरच्या गल्लीत महेश दिगंबर काकडे (१८, रा. नक्षत्रवाडी ) या युवकाचा धारदार शस्त्राने खुन करण्यात आल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
Weather Alert : राज्यावर आस्मानी संकट, आजपासून ‘या’ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर पडलेल्या अवस्थेत आसपासच्या लोकांनी पाहिले. जखमी महेश काकडे याला उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी महेश काकडेला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. ही घटना दारूच्या वादातून घडली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कराडे हे करित असून यासंबंधी प्रत्यक्षदर्शी आणि मृताच्या कुटुंबाचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे. खरंतर, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे. अशा प्रकारे हत्येच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे तरुणांना पोलिसांचा धाक उरला नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.
राजकीय संघर्ष पेटणार! ओबीसी आरक्षणाशिवाय होणार जिल्हा परिषदेच्या निवडणुकाSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: