case against mla pn patil: सुनेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी आमदार पी.एन. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल


हायलाइट्स:

  • सुनेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी आमदार पी.एन. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल.
  • आमदार पाटील यांच्यासह त्यांच्या मुलगा व मुलीच्या विरोधातही गुन्हा दाखल.
  • आमदारांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुनेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी आमदार पी.एन. पाटील यांच्यासह त्यांच्या मुलगा व मुलगीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सौ. अदिती राजेश पाटील यांनी कराड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अदिती ही सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची पुतणी आहे. आमदारांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (a case has been registered against mla pn patil for physically and mentally abusing daughter in law)

याबाबत पोलिसांनी सांगितले की, दोन वर्षापूर्वी पी.एन. पाटील यांचा मुलगा राजेश व अदिती यांचा मोठ्या थाटामाटात कोल्हापुरात विवाह संपन्न झाला. लग्नानंतर आपला सासरी छळ करतानाच एक कोटीची मागणी केल्याचे अदिती यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सासरे पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी एन. पाटील, पती राजेश पांडुरंग पाटील व नणंद सौ. टीना महेश पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

क्लिक करा आणि वाचा- शरद पवार यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे: बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

पी.एन. पाटील हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. बाळासाहेब पाटील सहकार मंत्री तर अदितीचे वडिल सुभाष पाटील हेदेखील राजकारणात ज्येष्ठ नेते आहेत. गेले दोन तीन महिने या कुटुंबात वाद सुरू होता. तो मिटविण्यासाठी राजकीय पातळीवर समझोता करण्याचे प्रयत्न झाले. पण त्यात यश आले नाही. काँग्रेसच्या विद्यमान आमदारांवर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस’; सोमय्यांचा प्रहार

पी. एन. पाटील यांच्याकडून आरोपांचा इन्कार

आमदार पी. एन. पाटील यांनी त्यांच्यावरील आरोपांवर प्रतिक्रिया व्यक्त करत आरोपांचा इन्कार केला आहे. सुनेचा छळ करण्याचा कोणताही प्रकार आमच्याकडून घडलेला नाही. लग्न झाल्यापासून ती बहुतांशी काळ माहेरलाच आहे. त्यामुळे तिचा छळ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी राजकारणात आहे. अनेकांना नोकरी लावली. कुणाचा चहा देखील घेतला नाही. त्यामुळे सुनेकडे एक कोटी रुपये मागण्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. मनाला क्लेशदायक असणारा हा आरोप खोटा आहे, असे आमदार पी. एन. पाटील यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- मुंबई, पुण्यापाठोपाठ उल्हासनगरही हादरले; १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: