PM Narendra Modi: ‘महाराष्ट्र, केरळमधील कोविड रुग्णसंख्या पाहता आत्मसंतुष्टतेला जागा नाही’


हायलाइट्स:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीच्या अध्यक्षस्थानी
  • कोविड १९, लसीकरणासंबंधी उच्च स्तरीय बैठक
  • पायाभूत सुविधा उभारण्यावर राहणार भर

नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील कोविड १९ परिस्थिती तसंच लसीकरण मोहिमेसंबंधी एका उच्च स्तरीय बैठक घेतली. यावेळी, महाराष्ट्र आणि केरळमध्ये वाढलेल्या करोना रुग्णसंख्येचा उल्लेख करताना कोणत्याही पद्धतीचा बेजबाबदारपणा परवडणार नसल्याचं सरकारकडून म्हटलं गेलंय.

सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत वक्तव्यानुसार, पंतप्रधानांनी कोविड इमर्जन्सी रिस्पॉन्स पॅकेज – २ अंतर्गत बालचिकित्सा तसंच इतर सुविधांसाठी रुग्णखाटांच्या क्षमतेचा आढावा घेतला. भारतात महाराष्ट्र आणि केरळच्या आकड्यांवर नजर टाकली असता आत्मसंतुष्टतेला कोणतीही जागा उरणार नाही. मात्र, सलग दहाव्या आठवड्यात देशाचा संक्रमण दर तीन टक्क्यांहून कमी आहे, असंही या वक्तव्यात नमूद करण्यात आलंय.

राज्यांतील ग्रामीण भागात परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी प्राथमिक सुविधा केंद्र तसंच ब्लॉक स्तरावर आरोग्य विषयक पायाभूत सुविधा पुन्हा एकदा रेखाटण्याचा आणि उभारण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिलाय.

sansad tv : PM मोदी लाँच करणार नवी वाहिनी, काँग्रेस नेत्याचा धर्मासंबंधित कार्यक्रम, सूत्रांची माहिती
income tax : प्राप्तीकर विभागाच्या रडारवर ‘न्यूज लाँड्री’ आणि ‘न्यूज क्लिक’ वेबसाइट

राज्यात जिल्हा स्तरावर कोविड १९, म्युकरमायकोसिस, एमआयएस-सी (मुलांमधील गंभीर आजार) यांच्याशी संबंधी उपचारांत वापरल्या जाणाऱ्या औषधांसाठी ‘बफर स्टॉक’ बनवण्यात यावा, असेही यात निर्देश देण्यात आले आहेत.

ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर, ऑक्सिजन सिलिंडर आणि पीएसए संयंत्रांसहीत ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी याच्याशी निगडीत संपूर्ण प्रणाली तेजीनं उभारण्याची आवश्यकता यात अधोरेखित करण्यात आलीय. राज्यांना जवळपास एक लाख ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर आणि तीन लाख ऑक्सिजन सिलिंडर वाटण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

या बैठकीत पंतप्रधानांचे मुख्य सचिव, कॅबिनेट सचिव, मुख्य वैज्ञानिक सल्लागार, आरोग्य सचिव, सदस्य (आरोग्य) नीति आयोग आणि इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. भारतात अद्यापही करोना संक्रमणाची दुसरी लाट कायम असल्याचं बैठकीच्या एक दिवस आधी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटलं होतं. ३५ जिल्ह्यांमध्ये अद्यापही साप्ताहिक संसर्गाचे प्रमाण १० टक्क्यांहून अधिक आहे, तर ते ३० जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण ५ ते १० टक्के आहे.

coronavirus india: देशात कशी आहे करोनाची स्थिती? PM मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक
Mamata Banerjee: भवानीपूर पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री ममतांचा उमेदवारी अर्ज दाखलSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: