Afghanistan Crisis: तालिबानकडून दोन पत्रकारांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण!


हायलाइट्स:

  • दोन्ही पत्रकार ‘इतिलात ए रोझ’ या वृत्तसंस्थेशी निगडीत
  • महिला आंदोलनाचं वार्तांकन केलं म्हणून मारहाण
  • तालिबानकडून मानवी हक्कांची सर्रास पायमल्ली जगासमोर

काबूल : अफगाणिस्तानात तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर आपली प्रतिमा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मूळ कट्टरतावादी असणाऱ्या या दहशतवादी संघटनेचा अनेक स्थानिक मीडियाकडून आणि पत्रकारांकडून पर्दाफाश करण्यात आला. काही पत्रकारांनी काबूलमध्ये अफगाणी महिलांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाचं वार्तांकन केलं. या कारणावरून तालिबाननं या पत्रकारांना ताब्यात घेत जबर मारहाण केल्याचं समोर आलंय. गेल्या मंगळवारी ही घटना घडली.

या पत्रकारांना करण्यात आलेल्या मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या फोटोंत पत्रकारांच्या पाठीवरचे आणि पार्श्वभागावर फटक्यांचे वळ स्पष्टपणे दिसून येत आहेत. पत्रकारांना इतकी मारहाण करण्यात आलीय की त्यांना धड चालताही येत नाही. मानवाधिकार संघटनांकडून या घटनेची नोंद घेण्यात आलीय.

बुधवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये काही महिलांनी पाकिस्तानविरोधात आंदोलन केलं होतं. तालिबानकडून सर्रासपणे मानवी अधिकार तसंच महिलांच्या अधिकारांची पायमल्ली होत असल्याचा विरोध करत या महिलांनी आपला आवाज उंचावला होता.

या आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना तालिबानकडून रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आलीय. ‘इतिलात ए रोझ’ या स्थानिक वृत्तसंस्थेशी संबंधीत ताकी दरयाबी आणि नेमात नक्दी या दोन पत्रकारांना तालिबाननं ताब्यात घेतलं होतं. यथेच्छ मारहाण करण्यात आल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. दोघांनाही चालता येणं कठीण झालंय.

india taliban : तालिबानवर लगेचच संशय घेऊ शकत नाही, पण भारतावर कुरघोडी केली तर प्रत्युत्तरास सज्ज, सूत्रांची माहिती
NSA अजित डोवल आणि CIA प्रमुख बर्न्स यांच्यात दिल्लीत बैठक, तालिबानवर सल्लामसलत!

‘लॉस एन्जेलिस टाईम्स’मध्ये प्रकाशित करण्यात आलेला एक फोटो ट्विट करत पत्रकार शरीफ हसन यांनी या घटनेची निंदा केलीय. हसन हेदेखील अफगाणिस्तानातील घटनांचं वार्तांकन करत आहेत.

अफगाणिस्तानात बंदुकीच्या जोरावर सत्ता आपल्या ताब्यात घेणाऱ्या इस्लामी कट्टरपंथी शासकांच्या विरोध करताना आपल्या अधिकारांच्या मागणीसाठी आता हळूहळू अफगाणिस्तानातील सामान्य जनता रस्त्यावर उतरताना दिसतेय. अनेक ठिकाणी आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या महिलांवर फायरिंगच्याही घटना घडल्याचं समजतंय.

तालिबान सरकारविरोधात होत असलेली आंदोलनं समाप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच कोणत्याही प्रकारच्या आंदोलनासाठी अगोदर तालिबान सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असंही आदेशात म्हटलं गेलंय.

अफगाणिस्तान: पंतप्रधान अखुंद होता बामियानमधील बुद्धमूर्तीचा तोडफोडीचा प्रमुख सूत्रधार
आत्मघाती हल्ल्यासाठी द्यायचा प्रशिक्षण; तालिबानने केले मंत्रीSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: