Jammu Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये चार पत्रकारांच्या घरावर छापे, लॅपटॉप-मोबाईल जप्त


हायलाइट्स:

  • पत्रकारांच्या घरावर छापे
  • मोबाईल, लॅपटॉप केले जप्त
  • चौकशीनंतर पत्रकारांना सोडलं

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांनी या आठवड्यात चार पत्रकारांच्या घरावर छापेमारी केलीय. छापेमारी दरम्यान कायदेशीर प्रक्रियेचं संपूर्णत: पालन करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

चार पत्रकारांच्या घरी छापे

हिलाल मीर (टीआरटी वर्ल्ड) , शाह अब्बास (मुक्त पत्रकार), अजहर कादहरी (द ट्रिब्युन) आणि शौकत मित्रा (माजी संपादक) अशी या चार पत्रकारांची नावं आहेत. त्यांच्या घरांवर छापे टाकल्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशीसाठी त्यांना ताब्यातही घेतलं होतं. परंतु, त्याच सायंकाळी त्यांना सोडून देण्यात आलं. खबरदारी म्हणून या पत्रकारांचे लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

income tax : प्राप्तीकर विभागाच्या रडारवर ‘न्यूज लाँड्री’ आणि ‘न्यूज क्लिक’ वेबसाइट

अजब! ‘हाय सिक्युरिटी झोन’मध्ये बाप-बेट्यानं गाडीत हेल्मेट घालून आठवडा काढला
काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाकडून पत्रकारांना ‘त्रास देण्याचा’ कोणताही प्रयत्न नाही. तर एका संवेदनशील प्रकरणाच्या चौकशी दरम्यान पोलिसांनी हे छापे टाकले आहेत.

यासंबंधी खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्या देऊन तपासणीत हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घेण्याचा सल्लाही पोलीस महानिरीक्षकांनी मीडियाला यावेळी दिला.

प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तींविरोधात सबळ पुरावा हाती लागल्यानंतरच त्यांना ताब्यात घेतलं जाईल, असंही पोलिसांनी म्हटलंय.

sansad tv : PM मोदी लाँच करणार नवी वाहिनी, काँग्रेस नेत्याचा धर्मासंबंधित कार्यक्रम, सूत्रांची माहिती
PM Narendra Modi: ‘महाराष्ट्र, केरळमधील कोविड रुग्णसंख्या पाहता आत्मसंतुष्टतेला जागा नाही’Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: