चीनकडे जगातील सर्वात मोठे सैन्य, भारत कितव्या स्थानी? जाणून घ्या


बर्लिन: आक्रमक विस्तारवादी भूमिका घेणारा चीन सीमावर्ती भागात सैनिकांची कुमक वाढवत आहे. तर, दुसरीकडे नवनवीन देशांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करत आहे. चीनकडून मागील काही वर्षात संरक्षण क्षेत्रातील खर्चही वाढवण्यात आला होता. एका पाहणीनुसार, चीनकडे जगातील सर्वाधिक सैन्य असल्याचा दावा करण्यात आला आहे.

जर्मन डेटाबेस कंपनी स्टेटिकाकडून जगातील सर्वाधिक सैन्य असलेल्या देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत चीन पहिल्या स्थानी असून भारत दुसऱ्या स्थानावर आहे. तर, या अहवालात ब्रिटिश सैन्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

स्टेटिकाच्या ताज्या अहवालानुसार, चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी जगातील सर्वात मोठे सैन्य आहे. वर्ष २०२१ मधेये चिनी सैन्यामध्ये नोंदणीकृत कर्मचाऱ्यांची संख्या २१ लाख ८५ हजाराच्या घरात आहे. चीन सैन्य पाच विभागांमध्ये विभागले गेले आहे. यामध्ये ग्राउंड फोर्स, हवाई दल, नौदल, रॉकेट फोर्स, स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्सचा समावेश आहे. चिनी सैन्य पाच थिएटर कमांडमध्ये काम करतात.

हिंदी महासागरात ‘ड्रॅगन’ वाढवतोय वर्चस्व; भारताची डोकेदुखी वाढली!
भारत दुसऱ्या स्थानावर

सर्वाधिक सैन्याच्या यादीत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. भारतातील एकूण नोंदणीकृत सैन्य, कर्मचाऱ्यांची संख्या १४ लाख ४५ हजाराच्या घरात आहे. यामध्ये भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाचा समावेश आहे. त्याशिवाय भारताकडे जगातील सर्वात मोठी पॅरामिलिट्री आहे. यामध्ये सीमा सुरक्षा दल, केंद्रिय राखीव पोलीस दल, केंद्रिय औद्योगिक पोलीस दल, सशस्त्र सीमा दल, इडो-तिबेट सीमा पोलीस, एनएसजी, एसपीजी आदींचा समावेश आहे.

Explainer : चीनला का हवाय अफगाणिस्तानमधील बगराम हवाईतळ?
पहिल्या दहामध्ये या देशांचा समावेश

सैनिकांच्या संख्येबाबत अमेरिका जगात तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकन सैन्याच्या सर्व विभागांमध्ये काम करणाऱ्या जवानांची संख्या १४ लाखांच्या आसपास आहे. चीन, भारत, अमेरिका, उत्तर कोरिया, रशिया, पाकिस्तान, दक्षिण कोरिया, इराण, व्हिएतनाम आणि सौदी अरेबिया या देशांकडे सर्वाधिक सैन्य आहे. स्टेटिस्टाच्या विश्लेषणानुसार, बांगलादेश हा सर्वात खालच्या स्थानावर असून
दोन लाख सक्रिय सैन्य त्यांच्याकडे आहे.

ब्रिटनकडे इजिप्त, म्यानमारपेक्षाही कमी सैन्य

या यादीत ब्रिटनच्या सैनिकांच्या घटत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. ब्रिटनचा सैन्य आकार हा इजिप्त, म्यानमार, इंडोनेशिया, थायलंड आणि तुर्की सारख्या देशांपेक्षाही कमी आहे. फ्रान्सकडे ब्रिटनपेक्षा अधिक सैन्य आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: