somaiya criticizes shiv sena: ‘उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस’; सोमय्यांचा प्रहार


हायलाइट्स:

  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याची शिवसेनेचे घोषणा.
  • भाजप नेते किरीट सोमय्या यांचे शिवसेनेच्या या घोषणेवर टीकास्त्र.
  • ही घोषणा राज्यातील घडामोडींवरून लक्ष विचलित करण्यासाठी- सोमय्या.

मुंबई: शिवसेनेने उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर केले असून पक्ष सर्वच ४०३ जागा स्वबळावर लढवणार आहे. असे असले तरी भविष्यात एखाद्या पक्षाशी युती करण्याचे संकेतही शिवसेनेने दिले आहेत. शिवसेनेच्या या घोषणेनंतर आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अशा प्रकारच्या घोषणा या राज्यातील घडामोडींवरून लक्ष विचलित करण्यासाठी करण्यात येत असल्याची टीका सोमय्या यांनी केली आहे. (bjp leader kirit somaiya criticizes cm uddhav thackeray over uttar pradesh assembly election)

किरीट सोमय्या मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना शिवसेनेच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याच्या घोषणेबाबत विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना करत असलेली ही घोषणा राज्यातील घडामोडींवरुन लक्ष्य विचलीत व्हावे यासाठीच केली जात आहे. यापूर्वी शिवसेने बिहारमध्ये निवडणूक लढवली होती, त्यावेळी काय झाले? तेथे शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझीटच जप्त झाले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या काही उमेदवारांना तर १०० मतेही पडलेली नव्हती, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला आहे.

क्लिक करा आणि वाचा- शरद पवार यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे: बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनील परब यांच्यावर लोकायुक्तांनी केलेल्या कारवाईबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. अनिल परब यांचे कार्यालय तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती देतानाच ठाकरे सरकारने न्यायालयामध्ये लोकायुक्तांसमोर अनिल परब याच्या कार्यालयाचे बांधकाम अनधिकृत असल्याची माहिती दिली आहे असे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. यावेळी त्यांना शिवसेना उत्तर प्रदेशातील निवडणूक लढवणार असल्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.

क्लिक करा आणि वाचा- मुंबई, पुण्यापाठोपाठ उल्हासनगरही हादरले; १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार
क्लिक करा आणि वाचा- मैत्रिणीच्या सांगण्यावरून मित्रांनी घातला दरोडा; वृद्ध महिला डॉक्टरला लुटणाऱ्या पाच जणांना अटकSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: