कसोटी मालिका २-१ की २-२; रद्द झालेल्या सामन्यावर ICCने निर्णय घेण्याची मागणी


नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवी कसोटी मॅनचेस्टर येथील ओल्ड ट्रेफर्ड येथे होणार पाचवी कसोटी रद्द करण्यात आली. यावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC)ला पत्र लिहून मॅनचेस्टर कसोटी सामन्यावर निकाल देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे.

भारतीय संघात करोनाचा शिरकाव झाल्याने बीसीसीआय आणि ईसीबीने काही तास बैठकीनंतर पाचवी कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर ईसीबीने आयसीसीकडे विनंती केली आहे की त्यांनी या प्रकरणी निर्णय घ्यावा मालिकेचा निकाल २-१ असा किंवा २-२ असा निर्णय द्यावा.

वाचा-मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यानंतर गावस्करांना आठवण आली २६/११ हल्ल्याची

ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरीसन यांनी शुक्रवारी स्पष्ट केले होते की, रद्द करण्यात आलेली पाचवी कसोटीच्या बदली प्रस्तावित टेस्ट मालिकेशिवाय आणखी एक मॅच खेळवली जाईल. या मागणीसह मालिके संदर्भातील फैसला ईसीबीने आयसीसीच्या कोर्टात टाकला आहे.

पाचवी कसोटी ही करोना व्हायरसमुळे नव्हे तर भविष्यात काय होऊ शकते याचा विचार करून रद्द करावा लागला. भारतीय खेळाडूंना नॉर्मल वाटावे यासाठी सर्व काही प्रयत्न केले गेले.

वाचा- US Open 2021: अमेरिकन ओपन: गेल्या ५३ वर्षात असे घडले नाही, एम्मा रादुकानूला विजेतेपद

या मालिकेतील पाचवी कोसटी नंतर स्वतंत्र एक कसोटी सामन्याची मालिका म्हणून खेळवली जाणार असेल तर सध्याच्या मालिकेत भारताला विजेते मानले जाईल कारण टीम इंडिया २-१ ने आघाडीवर आहे. अर्थात यावर अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही. रद्द झालेली कसोटी मॅच पुढील वर्षी जुलै महिन्यात खेळवली जाऊ शकते. तेव्हा भारत मर्यादीत षटकांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.

भारताने लॉर्ड्स मैदानावर झालेली दुसरी कसोटी १५१ धावांनी त्यानंतर ओव्हल मैदानावर झालेली चौथी कसोटी १५७ धावांनी जिंकली होती. इंग्लंडने लीड्सवर झालेली तिसरी कसोटी एक डाव आणि ७६ धावांनी जिंकली होती. दोन्ही संघातील पहिली कसोटी पावसामुळे ड्रॉ झाली होती.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: