WTC FINAL : तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, भारताकडे किती धावांची आघाडी आहे पाहा…


साउदम्प्टन: फायनच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ नुकताच थांबवण्यात आला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बऱ्याच घडामोडी घडल्या. भारताचा संघ यावेळी २१७ धावांमध्ये सर्वबाद झाला. त्याबरोबर भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबण्यापूर्वी न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले आहे.

भारताची आजच्या दिवसाची सुरुवात वाईट झाली. कारण भारताचा कर्णधार विराट कोहली (४४) आज एकही धावाची भर घालू शकला नाही आणि त्याला कायले जेमिन्सनने बाद केले. भारतासाठी हा एक मोठा धक्का होता. त्यानंतर पंत देखील ४ धावांवर माघारी परतला. उपकर्णधार अजिंक्य रहाणे चांगल्या लयीमध्ये दिसत होता. त्याचे अर्धशतक १ धावाने हुकले. रहाणेच्या जागी आलेल्या आर अश्विनने वेगाने धावा केल्या. तो २७ चेंडूत २२ धावा करून बाद झाला.


अजिंक्यला त्यावेळी अर्धशतक पूर्ण करण्यासाठी एका धावेची गरज होती. त्यावेळी अजिंक्यला या दुसऱ्या उसळत्या चेंडूवरही चांगला फटका मारता आला नाही. पण न्यूझीलंडने यावेळी आपले क्षेत्ररक्षण बदलले आणि अजिंक्यचा झेल त्यांनी पकडला. बाद होण्यापूर्वी अजिंक्यला एक धोक्याची घंटा मिळाली होती. पण अजिंक्यने त्याकडे पाहिले नाही आणि त्यामुळेच त्याचे अर्धशतकही पूर्ण होऊ शकले नाही. अजिंक्यने जर अर्धशतक केले असते तर भारतीय संघाचे मनोबल उंचावले असते.

न्यूझीलंडने या वेळी आपल्या पहिल्या डावाची संथपणे सुरुवात केली असली तरी त्यांनी जास्त काळ भारतीय संघाला विकेट मिळवू दिली नाही. पण यावेळी भारताच्या मदतीला आर. अश्विन धावून आला. कारण अश्विनने यावेळी न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला (३०) बाद केले आणि भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर न्यूझीलंडचा दुसरा सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतक झळकावल्यावर त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने यावेळी त्याला ५४ धावांवर बाद केले. त्यामुळे दिवसअखेर न्यूझीलंडची २ बाद १०१ अशी अवस्था झाली आहे, त्यामुळे भारतीय संघ अजूनही ११६ धावांनी आघाडीवर आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: