अजिंक्य रहाणेला मिळणार डच्चू; संघ व्यवस्थापनाने दिले स्पष्ट संकेत


मॅनचेस्टर: भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या मालिकेत तिसरी कसोटी वगळता टीम इंडियाची कामगिरी शानदार झाली आहे. पहिल्या कसोटीत पावसामुळे भारताचा विजय हुकला, त्यानंतर लॉर्ड्स आणि चौथ्या कसोटीत ओव्हलवर विजय मिळून भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. भारत आता ही मालिका गमावणार नाही हे निश्चित झाले आहे. या सर्वात भारतीय संघाची एकच मोठी काळजी आहे ती म्हणजे उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा फॉम होय.

इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटीत अजिंक्य रहाणेला फार चांगली कामगिरी करता आली नाही. लॉर्ड्स मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात ६१ धावांची खेळी वगळता अजिंक्यने मालिकेत ५,१,१८,१०,१४ आणि ० अशा धावा केल्या आहेत. अजिंक्यच्या या मालिकेतील एकूण धावा १०७ आहेत आणि सरासरी फक्त १५.५ तर फक्त दोन सामने खेळडून शार्दूल ठाकूरने ११७ धावा केल्या आहेत.

चौथ्या कसोटीत भारतीय संघाने पहिल्या डावात पाचव्या क्रमांकावर अजिंक्यच्या जागी रविंद्र जडेजाला फलंदाजीला पाठवले होते. या बदलाबद्दल अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केले होती. इतक नव्हे तर या बदलाचा फायदा भारतीय संघाला झाला नाही. त्यानंतर दुसऱ्या डावात देखील अजिंक्यच्या जागी जडेलाला फलंदाजीला पाठवण्यात आले. यावरून संघ व्यवस्थापनाने एक मोठा संदेश दिला आहे.

एखादा फलंदाज जेव्हा खराभ फॉममध्ये असतो तेव्हा त्याला व्यवस्थापनाकडून पाठिंबा दिला जातो. पण अजिंक्यच्या बाबत आता तसे होताना दिसत नाही. त्याच्या नियमित क्रमांकावर जडेलाला दोन वेळा पाठवण्यात आले आणि या दोन्ही वेळा जडेजा धावा करण्यात अपयशी ठरला. जर संघाला उजवा आणि डावा फलंदाज अशी योजना करायची असती तर तिसरी विकेट गेल्यानंतर ऋषभ पंतला पाठवले गेले असते. पण जडेला पाठवून संघ व्यवस्थापनाने अजिंक्यला स्पष्ट इशारा दिल्याचे कळते.

अजिंक्य गेल्या काही वर्षापासून ज्या क्रमांकावर खेळत आहे तेथे त्याला फलंदाजीला न पाठवता अन्य खेळाडूला पाठवले जात असेल तर त्यावरून संघ व्यवस्थापन वेगळा विचार करत असल्याचे दिसून येते.

गेल्या १५ डावात अजिंक्यला फक्त एकच अर्धशतक करता आले आहे. या काळात त्याने २८५ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुसऱ्या मेलबर्न कसोटीत अजिंक्यने शतक केले होते. ही त्याची गेल्या २ वर्षातील सर्वात मोठी खेळी होती. सध्या त्याची सरासरी ४०च्या खाली गेली आहे. २०१६ साली जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने १८८ धावा केल्या होत्या तेव्हा सरासरी ५०च्या पुढे गेली होती. गेल्या चार वर्षात अजिंक्यने ३३च्या सरासरीने धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत चौथ्या कसोटीत भारताला नवा उपकर्णधार मिळाला तर अश्चर्य वाटू नये.

याआधीही इंग्लंडमध्ये अपयशी ठरला आहे अजिंक्य…

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या या मालिकेआधी अजिंक्यची इंग्लंडमधील कामगिरी खराब होती. इंग्लंडमध्ये अजिंक्यने आतापर्यंत २० डावात ५५६ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी २९.२६ इतकी असून त्यात एक शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. या २० डावात तो दोन वेळा शून्यावर बाद झालाय. अजिंक्यने इंग्लंडमध्ये गेल्या १० डावात २५७ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी फक्त २५.७० इतकी आहे. या १० डावात तो ७ वेळा ३० पेक्षा कमी धावसंख्या करून बाद झालाय. इतक नव्हे तर ६ डावात त्याने ५० चेंडू देखील खेळले नाहीत. या कामगिरीत सध्याच्या मालिकेतील आकडेवारी जोडल्यास अजिंक्यची कामगिरी आणखी खाली जाते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: