5th Test: ५० वर्षाचा विक्रम मोडला, आता टीम इंडिया समोर ८५ वर्षाचा इतिहास बदलण्याचे आव्हान


मॅनचेस्टर: भारतीय संघाने ओव्हल मैदानावर झालेल्या चौथ्या कसोटीत यजमान इंग्लंडचा १५७ धावांनी पराभव करून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. भारताच्या या विजयाचे खास वैशिष्ट म्हणजे ओव्हल मैदानावर भारताचा गेल्या ५० वर्षातील हा पहिलाच विजय ठरला. आता मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार आहे.

वाचा – अजिंक्य रहाणेला मिळणार डच्चू; संघ व्यवस्थापनाने दिले स्पष्ट संकेत

मॅनचेस्टरच्या ओर्ल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारतीय संघ १९३६ पासून खेळत आहे. १९३६ ते २०१४ या काळात भारताने ९ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी चार कसोटीत पराभव तर पाच सामने ड्रॉ झालेत. याचा अर्थ गेल्या ८५ वर्षात भारताला या मैदानावर एकही विजय मिळवता आलेला नाही.

यजमान इंग्लंडने या मैदानावर ८१ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी ३१ मध्ये विजय, १५ मध्ये पराभव तर ३५ लढती ड्रॉ झाल्यात.

वाचा- पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघात ३ बदल; उपकर्णधाराला विश्रांती देणार?

भारताच्या २०१४च्या दौऱ्यात अखेरच्या कसोटीत इंग्लंडने याच मैदानावर एक डाव आणि ५४ धावांनी पराभव केला होता. तेव्हा टॉस जिंकून भारताने पहिल्या डावात १५२ धावा केल्या होत्या. कर्णधार धोनीने सर्वाधिक ७१ धावांची खेळी केली होती. इंग्लंडने पहिल्या डावात ३६७ धावा केल्या. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज पुन्हा अपयशी ठरले. त्यांना १६२ धावा करता आल्या होत्या.

विराट आणि कंपनी समोर आता ८५ वर्षाचा इतिहास बदलण्याची संधी आहे. गेल्या काही वर्षात भारताने अनेक विक्रम मोडले आहेत. विशेषत: परदेशात प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून भारताने विक्रम केले आहेत. ओव्हल मैदानावर अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली १९७१ मध्ये विजय मिळवला होता. त्यानंतर २०२१ मध्ये भारताने ही कामगिरी केली. या मालिकेत भारताने ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर विजय मिळवाल होता. कपील देव आणि धोनी नंतर अशी कामगिरी करणारा विराट तिसरा भारतीय कर्णधार ठरला.

वाचा- विजयानंतरच्या विराटच्या त्या कृतीला ठरवले ‘क्लासलेस’

२०२१च्या सुरुवातीला भारताने ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर ऑस्ट्रेलियाचा धुळ चारली. या मैदानावर गेल्या ३२ वर्षात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला नव्हता. तेव्हा भारताने ३२८ धावांचे लक्ष्य गाठले होते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: