इंडोनेशिया: तुरुंगाला भीषण आग; ४१ कैदी ठार, ३९ जखमी


जकार्ता: इंडोनेशियाची राजधानी जकार्ताजवळ असणाऱ्या एका तुरुंगाला बुधवारी भीषण आग लागली. या आगीमध्ये ४१ कैद्यांचा मृत्यू झाला असून ३९ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जकार्ताजवळील तांगेरांग तुरुंगाच्या सी ब्लॉकमध्ये पहाटेच्या सुमारास आग लागली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अमली पदार्थांच्या तस्करीशी निगडित असलेल्या गुन्हेगारांना या तुरुंगात ठेवले जाते. तुरुंगाला आग नेमकी कशी लागली, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या तुरुंगाची क्षमता १२२५ कैद्यांची आहे. मात्र, दोन हजारांहून अधिक कैद्यांना या तुरुंगात डांबण्यात आले. आग लागली तेव्हा सी ब्लॉकच्या तुरुंगात १२२ कैदी होते.

आग लागल्याचे समजताच, पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. जखमी झालेल्या कैद्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: