भाविकांसाठी IRCTC कडून ‘रामायण सर्किट ट्रेन’ सुरू, कसा असेल प्रवास? जाणून घ्या…


हायलाइट्स:

  • एकूण १७ दिवसांचा प्रवास
  • प्रवासासहीत प्रवाशांच्या राहण्या-खाण्या-पिण्याची सोय
  • कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी

नवी दिल्ली :आयआरसीटीसी‘कडून ७ नोव्हेंबर पासून रामायण सर्किट ट्रेनला सुरूवात करण्यात आलीय. या रेल्वेच्या माध्यमातून श्रीरामाशी निगडीत वेगवेगळ्या धार्मिक स्थळांचं दर्शन भाविकांना एकाच फेरीत घेता येणार आहे. आयआरसीटीसीनं दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून ही रेल्वे रवाना होईल. त्यानंतर अयोध्या ते रामेश्वरम असा प्रवास ही रेल्वे करणार आहे.

१७ दिवसांचा प्रवास

ही रेल्वे १७ दिवसांत ७५०० किलोमीटरचं अंतर कापणार आहे. दिल्लीहून निघाल्यानंतर रामायण सर्किट ट्रेन सर्वात अगोदर अयोध्येत दाखल होईल. इथे श्रीराम जन्मभूमी मंदिर, श्री हनुमान मंदिर आणि भरत मंदिराचे दर्शन भाविकांना करता येईल. त्यानंतर ही रेल्वे सीतामढीकडे वाटचाल करेल. इथे जानकी जन्म स्थान आणि राम मंदिराचे दर्शन घेता येईल. इथून पुढे ही रेल्वे काशी, चित्रकूट आणि नाशिकहून प्रवास करत कर्नाटकातील हम्पीत दाखल होईल. या प्रवासाचा शेवट रामेश्वरम स्टेशनला होईल. इथून ही रेल्वे पुन्हा राजधानी दिल्लीकडे रवाना होईल.

supreme court : मंदिराच्या संपत्तीवर देवतांचा मालकी हक्क, पुजारी फक्त व्यवस्थापकः सुप्रीम कोर्ट
VIDEO: मंदिर उघडण्याची मागणी, डमरू वाजवत विधानसभेत पोहचले भाजप आमदार

काय असेल तिकीट दर?

या प्रवासासाठी एसी फर्स्ट क्लासचं भाडं १ लाख ०२ हजार ०९५ रुपये असेल तर सेकंड क्लासचं भाडं ८२ हजार ९५० रुपये आहे.

तिकीट बुकींगसाठी प्रवासी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर संपर्क साधू शकतील. सध्या कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

रेल्वेकडून सुविधा

१७ दिवसांच्या या प्रवासात प्रवाशांच्या राहण्यासहीत खाण्या-पिण्याची सगळी व्यवस्था आयआरसीटीसीकडून करण्यात येईल. सोबतच लक्झरी बसमधून धार्मिक स्थळांकडे प्रवाशांना नेलं जाईल. राहण्यासाठी एसी हॉटेलची व्यवस्था उपलब्ध असेल. तसंच लायब्ररी, किचन, शॉवर आणि टॉयलेट अशा सुविधाही उपलब्ध असतील.

Gorakhpur: होडीतून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थीनीचा फोटो व्हायरल, राहुल गांधींचा मदतीचा हात
Madhya Pradesh: पाऊस पडावा म्हणून… अल्पवयीन आदिवासी मुलींना गावात निर्वस्र फिरवलं!
Kerala: ऑनलाईन मित्रासाठी अल्पवयीन मुलीनं घरातून गायब केलं ७५ तोळे सोनं!Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: