चीनच्या वरिष्ठ अणू शास्त्रज्ञाचा संशयास्पद मृत्यू


बीजिंग: चीनचे वरिष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि हार्बिन अभियांत्रिकी विद्यापीठाचे उपाध्यक्ष झांग झिजियान यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. एका इमारतीवरून कोसळल्यामुळे हा मृत्यू झाला आहे. झांग झिजियान यांनी चीनच्या अणू कार्यक्रमाशी संबंधित असलेल्या संस्थेचे पदाधिकारी म्हणूनही जबाबदारी स्वीकारली होती.

विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, हार्बिन अभियांत्रिकी विद्यापीठाला ही माहिती देताना अतीव दु:ख होत आहे. प्रा. झांग झिजियान हे एका इमारतीवरून पडले आणि १७ जून रोजी त्यांचे निधन झाले. झांग यांच्या मृत्यूबाबत विद्यापीठाशिवाय इतर कोणत्याही संस्था, तपास यंत्रणांकडून अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आले नाही. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.

वाचा: जगाला टेन्शन? चीनमध्ये अणू प्रकल्पातून किरणोत्सारी पदार्थाची गळती!

झांग या ठिकाणी कॉलेज ऑफ न्यूक्लिअर सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजीमध्ये प्राध्यापक होते. त्याशिवाय विद्यापीठातील कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीचे सदस्यदेखील होते. वर्ष २०१९ मध्ये अणू ऊर्जा सुरक्षा संशोधनातील योगदानासाठी त्यांना कियान सॅनकियांग तंत्रज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. झांग यांना मागील वर्षी मे महिन्यात चीन सरकारनेदेखील पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. हार्बिन विद्यापीठाचा चिनीच्या लष्करासोबत थेट संबंध आहे.

वाचा:ब्रिटनमध्ये डेल्टा वेरिएंटचा हाहा:कार; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा

पाहा: आश्चर्यच! ; अवघ्या २९ तासांत उभी राहिली १० मजली इमारती

काही दिवसांआधीच चीनच्या एका अणू प्रकल्पातून किरणोत्सारी पदार्थांची गळती होत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या वरिष्ठ अणू शास्त्रज्ञाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: