corona in maharashtra latest updates: चिंताजनक! आज राज्यात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ; मृत्यूही वाढले


हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ८९८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३ हजार ५८१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज राज्यात एकूण ८६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


मुंबई: राज्यात कालच्या तुलनेत आज करोना (coronavirus) बाधितांच्यादैनंदिन रुग्णसंख्या मात्र किंचित वाढली असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील मोठी घट झाली आहे. या बरोबरच आज झालेल्या मृत्यूंच्या संख्येत कालच्या तुलनेत वाढ झाली आहे. तसेच कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील थोडी वाढली असल्याने आजची स्थिती तुलनेने चिंताजनक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ३ हजार ८९८ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार ६२६ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार ५८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ५ हजार ९८८ इतकी होती. तर, आज ८६ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ३७ इतकी होती. (maharashtra registered 3898 new cases in a day with 3581 patients recovered and 86 deaths today)

आज राज्यात झालेल्या ८६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ०४ हजार ३३६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के इतके झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा- अनधिकृत फेरीवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावाच लागेल; मुख्यमंत्री कडाडले

राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या किंचित वाढली

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४७ हजार ९२६ वर आली आहे. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १२ हजार ४०९ वर गेला आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या वाढून ती ७ हजार ४५९ वर आली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ५ हजार ६०६ इतकी खाली आली आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ४ हजार ३३१ अशी वाढली आहे. तर, सांगलीत एकूण २ हजार ७०८ वर खाली आली आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या २ हजार ६४८ वर खाली आली आहे.

क्लिक करा आणि वाचा- मंदिरे उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान, म्हणाले…

मुंबईत उपचार घेत आहेत ४,१६५ रुग्ण

मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ४ हजार १६५ इतकी आहे. तर, रत्नागिरीत १ हजार १०४, सिंधुदुर्गात ८३२, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८५७ इतकी आहे.

भंडारा जिल्ह्यात एक सक्रिय रुग्ण

या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४३७, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७२ इतकी वाढली आहे. अमरावतीत ही संख्या ७६ वर आली आहे. तर भंडारा जिल्ह्यात फक्त एक सक्रिय रुग्ण आहे. हीच राज्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

क्लिक करा आणि वाचा- शिवसेनेने कोकणासाठी अर्धी ट्रेन तरी सोडावी; नितेश राणे यांचा हल्लाबोल

३,०६,५२४ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५१ लाख ५९ हजार ३६४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ९३ हजार ६९८ (११.७७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ०६ हजार ५२४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ०२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: