nandkumar baghel arrested : मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना पोलिसांनी केली अटक, १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी


रायपूरः छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचे वडील नंदकुरमार बघेल यांना पोलिसांना ( nandkumar baghel arrested ) अटक केली आहे. नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मणांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून ही कारवाई करण्यात आली. रायपूर पोलिसांनी त्यांना अटक केली. यानंतर कोर्टात हजर केलं गेलं. वडील नंदकुमार बघेल यांचे वक्तव्य चुकीचे आहे. यामुळे कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री बघेल यांनी आधीच सांगितलं होतं.

ब्राह्मणांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नंदकुमार बघेल यांना रायपूरमधील कोर्टात हजर केलं गेलं. मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्या वडिलांना म्हणजेच नंदकुमार बघेल यांना दिल्लीत अटक करण्यात आली होती. कोर्टात हजर केल्यानंवर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला नाही. यामुळे कोर्टाने नंदकुमार बघेल यांना मंगळवारी १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, अशी माहिती रायपूरचे पोलिस अधीक्षक प्रशांत अग्रवाल यांनी दिली.

नंदकुमार बघेल यांच्याविरोधात छत्तीसगड पोलिसांनी रायपूरमध्ये रविवारी एफआयआर दाखल केली होती. लखनऊमध्ये आंदोलनावेळी नंदकुमार बघेल यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ब्राह्मण हे विदेशी आहेत आणि ते देशात राहण्याच्या लायकीचे नाहीत. यामुळे गावकऱ्यांनी ब्राह्मणांना आपल्या गावांमध्ये प्रवेश करू देऊ नये. प्रत्ये समजाशी मी बोलेल. यामुळे ब्राह्मणांवर बहिष्कार टाकता येईल, असं वक्तव्य नंदकुमार बघेल यांनी केलं होतं.

infosys panchajanya : इन्फोसिसविरोधात पांचजन्यमध्ये लेख; कोणतीही भारतीय कंपनी राष्ट्रविरोधी असू

काँग्रेस सरकारमध्ये कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. मग ते मुख्यमंत्र्यांचे ८६ वर्षांचे वडील असले तरी. पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाईल. एका समाजाविरोधात वडिलांनी टिप्पणी केल्याचं समोर आलं आहे, असं मुख्यमंत्री भुपेश बघेल म्हणाले होते.

javed akhtar rss : ‘जावेद अख्तरांची पाळंमुळं दुबईत, RSS ला धोका समजतात’Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: