किरीट सोमय्या नॉन स्टॉप! आता शरद पवारांना विचारले ‘हे’ दोन प्रश्न


हायलाइट्स:

  • ईडीच्या गैरवापरावर शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी
  • भावना गवळी प्रकरणात ईडी अकारण हस्तक्षेप करत असल्याचं पवारांचं मत
  • भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पवारांना केले प्रश्न

मुंबई: महाविकास आघाडीचे मंत्री व नेते यांच्यावर रोजच्या रोज नवनवे आरोप करणारे व विविध यंत्रणांकडं तक्रारी करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाच प्रश्न केले आहेत.

पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी आज ईडीच्या गैरवापरावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्याचं सांगताना, महाराष्ट्रात यापूर्वी ईडीच्या इतक्या केसेस कधी ऐकल्या होत्या का, असा सवालही पवारांनी केला होता. वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांचं उदाहरण त्यांनी दिलं होतं. ‘भावना गवळी यांच्या तीन शिक्षण संस्था आहेत. एक कंपनी आहे. या संस्थांचा व्यवहार २० ते २५ कोटींच्या घरात आहे. त्यांना ईडी त्रास देत आहे. ‘जिथं कुठं गैरव्यवहार झाला असेल, तिथं तपास करण्यासाठी धर्मादाय आयुक्त असतात. शाळा, कॉलेजचे आर्थिक व्यवहार त्यांच्या अखत्यारीत असतात. राज्य सरकारचं गृहखातं आहे. आपल्याकडे खोलात जाऊन चौकशी करण्याचा अधिकार असलेल्या संस्था असताना प्रत्येक ठिकाणी ईडी येऊन हस्तक्षेप करते, ही राज्याच्या अधिकारावर गदा आहे,’ असं पवार म्हणाले होते.

Sharad Pawar – kirit somaiya : शरद पवार यांना किरीट सोमय्यांनी विचारले दोन प्रश्न

वाचा: सरकारी अधिकारी अजूनही फडणवीसांना भेटतात; पवार म्हणाले…

या वक्तव्यानंतर सोमय्या यांनी पवारांनाच प्रश्न केले आहेत. ‘शरद पवार साहेब आता भावना गवळी यांचा बचाव करताहेत. पण भावना गवळी यांच्या कपाटातून पहाटे पाच वाजता ७ कोटी रुपये चोरीला गेले होते. हा पैसा त्यांच्याकडं कुठून आला? भावना गवळी ज्या कारखान्याच्या चेअरमन आहेत, त्या कारखान्यात ४४ कोटी रुपये केंद्र सरकारचे आणि ११ कोटी रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाचे होते, हा ५५ कोटी रुपयांचा कारखाना बुडाला. हाच बुडालेला कारखाना भावना गवळी यांच्या कंपनीनं २५ लाखांमध्ये विकत घेतला. याची चौकशी पवार साहेबांनी केली का?,’ असे प्रश्न सोमय्या यांनी केले आहेत. ‘भावना गवळी यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी होणार आणि कारवाई सुद्धा होणार,’ असंही सोमय्या म्हणाले.

वाचा: कायदा असूनही गायी, बैलांची हत्या सुरूच; पाहा श्रीरामपूरमध्ये काय सापडलं?Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: