तालिबान अमेरिकेच्या जखमेवर मीठ चोळणार? ‘हा’ निर्णय घेण्याची शक्यता


काबूल: २० वर्षांपूर्वी अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला करत तालिबानला सत्तेवरून खाली खेचले होते. आता अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबान सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतरही तालिबानकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. आता तालिबान अमेरिकेच्या जखमेवर मीठ चोळणार असल्याचे म्हटले जात आहे. तालिबान ९ सप्टेंबर रोजी सरकार स्थापन करणार असल्याचे म्हटले जात आहे.

अमेरिकेच्या जागतिक व्यापार केंद्राच्या जु्ळ्या इमारतीवर ११ सप्टेंबर २००१ मध्ये अल कायद्याच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याचा मास्टरमाइंड, अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला ताब्यात देण्याची मागणी अमेरिकेने केली होती. मात्र, तालिबानने याला नकार दिला. त्यानंतर अमेरिकेने अल कायदा आणि तालिबानविरोधात आक्रमक होत अफगाणिस्तानवर नॉर्दर्न अलायन्सच्या मदतीने हल्ला केला. काही दिवसांमध्येच तालिबानचा पाडाव झाला होता. अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्याला २० वर्ष पूर्ण होणार आहेत.

तालिबानकडून सरकार स्थापन सोहळ्याचे आमंत्रण; चीन, रशियाने घेतली ‘ही’ भूमिका

काबूल: पाकिस्तानविरोधात अफगाण नागरिक संतप्त; तालिबानचा आंदोलकांवर गोळीबार
तालिबानने २० वर्षानंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतली आहे. अमेरिकेने माघार घेताच तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. तालिबानने १५ ऑगस्ट रोजी काबूलचा ताबा मिळवला. त्यानंतर अमेरिकन सैन्य गेल्याशिवाय सत्ता स्थापन करणार नसल्याचे तालिबानने म्हटले होते. अमेरिकेने ३१ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानमधून संपूर्ण माघार घेतल्यानंतर तालिबानने सरकार स्थापन करण्याची हालचाल सुरू केली.

९/११ दहशतवादी हल्ल्यासंबंधी कागदपत्रे खुली होणार; बायडन यांचे आदेश
अफगाणिस्तानमधून अमेरिकेची माघार आणि तालिबानचा उदय हा अमेरिकेचा सपशेल पराभव असल्याचे विश्लेषक म्हणतात. त्यातच आता, तालिबानने ११ सप्टेंबर रोजी सरकार स्थापन करणार असल्याचे म्हटले जात आहे. तालिबानकडून अमेरिकेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याचे म्हटले जात आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: