VIDEO: मंदिर उघडण्याची मागणी, डमरू वाजवत विधानसभेत पोहचले भाजप आमदार


हायलाइट्स:

  • देशात करोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेचा धोका
  • मंदिरं उघडण्याची भाजप आमदाराची मागणी
  • डमरू वाजवत पोहचले विधानसभेत

रांची : देशात तज्ज्ञांनी करोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिलेला असताना काही राजकीय पक्षांकडून धार्मिक स्थळं भाविकांसाठी खुली करण्याचा आग्रह धरला जातोय. महाराष्ट्रापासून ते झारखंडपर्यंत ही मागणी जोर धरू लागलीय. याच दरम्यान, झारखंडच्या देवघर मतदारसंघाचे भाजपचे आमदार नारायण दास यांनी आपली मागणी रेटण्यासाठी एक अजब युक्ती शोधून काढली.

देशातील अनेक ठिकाणी करोनाचा धोका लक्षात घेता धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, नारायण दास यांनी मंगळवारी अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत आपल्या मतदारसंघातील बाबा वैद्यनाथ धाम पुन्हा एकदा उघडण्याची मागणी केली. आपली ही मागणी मांडण्यासाठी दास हे डमरू वाजतवत विधानसभेत दाखल झाले.

Madhya Pradesh: पाऊस पडावा म्हणून… अल्पवयीन आदिवासी मुलींना गावात निर्वस्र फिरवलं!
संघाची तालिबानशी तुलना : ‘जावेद अख्तर यांना अफगाणिस्तानात पाठवा’

बाबा वैद्यनाथ धाम केवळ देवघरच्याच नाही तर संपूर्ण देशासाठी आस्थेचं केंद्र आहे. असं सांगताना लवकरात लवकर मंदिरं उघडण्याचा आदेश सरकारनं द्यावा अन्यथा अधिवेशनानंतर देवघरमध्ये आंदोलन उभारलं जाईल, असा इशाराच दास यांनी दिलाय.

मंदिर हे अनेकांच्या रोजगाराचंही माध्यम आहे. बाबा वैद्यनाथ हे नेमकी रोजगार देण्याचं काम करतात. मग तो फुलांच्या माध्यमातून असो, मिठाईच्या किंवा इतर गोष्टी… पुरोहित समाजासहीत या सर्व विक्रेत्यांचं जीवन बाबांच्या मंदिरावर आश्रित आहे. गेल्या पाच महिन्यांपासून सरकारनं हे मंदिर बंद ठेवलंय. व्यापाऱ्यांवर इथून निघून जाण्याची वेळ येतेय, असं म्हणत आमदारा दास यांनी मंदिरावर उपजीविका असणाऱ्या लोकांचा प्रश्न मांडला.

Coronavirus: करोनाबाधितांची दिवसाची संख्या ३१ हजारांवर तर २९० जणांचा मृत्यू
Karnal Kisan Mahapanchayat: हरयाणात खट्टर सरकारकडून आंदोलक शेतकऱ्यांच्या अडवणुकीचा प्रयत्नSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: