इस्रायलच्या सुरक्षित तुरुंगातून सहा कैद्यांचे पलायन; चमच्याने भुयार खोदले!


तेल अविव : उत्तर इस्रायलमधील गिल्बोआ तुरुंग फोडून सहा पॅलेस्टिनी कैदी पळून गेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या नंतर इस्रायली पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली आहे. पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली असून, गस्त घातली जात आहे. एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे या कैद्यांनी चमच्याचा वापर करून भुयार खणले असल्याचे समोर आले आहे.

गिल्बोआ तुरुंग हा इस्रायलमधील सुरक्षिततेबाबत सर्वाधिक सुविधा असलेला तुरुंग आहे. तुरुंग फोडून पळून जाण्याची घटना या तुरुंगात दुर्मीळ मानली जात होती. मात्र, बाह्य मदतीने कैद्यांनी तुरुंगात भुयार तयार केले आणि कैदी पळून गेले असल्याचे म्हटले जात आहे.

काबूल: पाकिस्तानविरोधात अफगाण नागरिक संतप्त; तालिबानचा आंदोलकांवर गोळीबार

पलायन केलेल्या कैद्यांमध्ये दहशतवाद्यांचा म्होरक्या झकारिया झुबैदी याचाही समावेश आहे. त्याशिवाय दहशतवादी हल्ल्यांसाठी जन्मठेपेची शिक्षा झालेले तीन दहशतवादीही यात आहेत.

हिंदी महासागरात ‘ड्रॅगन’ वाढवतोय वर्चस्व; भारताची डोकेदुखी वाढली!

तर, इस्रायलचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री ओमर बार्लेव यांनी तुरुंगांतून पळून गेलेले कैदी वेस्ट बँकमध्ये दाखल झाले असल्याचे म्हटले आहे. कैद्यांनी तुरुंगातून पलायन करण्यासाठी अनेक बारिक गोष्टींचेही नियोजन केले असल्याचे त्यांनी म्हटले. या कैद्यांना पुन्हा अटक केली जाईल, असेही त्यांनी म्हटले.

‘या’ चिमुकल्या देशाची कमाल; दोन वर्षाच्या मुलांचे करोना लसीकरण
पॅलेस्टाइनमधील जहाल गटांनी इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले. इस्रायलच्या लष्कराला यापुढेही असेच धक्के बसणार असल्याचे जहाल गटांच्या नेत्यांनी म्हटले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: