विजयानंतरच्या विराटच्या त्या कृतीला ठरवले ‘क्लासलेस’


लंडन: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानावर नेहमी उत्साही असतो. संघाच्या विजयासाठी जे जे हव ते ते विराट करत असतो. एखादी विकेट पडली तरी सामन्यात विजय मिळवल्याप्रमाणे तो जल्लोष करतो. विराट अनेकदा मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना देखील उत्तर देतो. हे उत्तर नेहमीच भारतीयांना नसते तर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना देखील असते.

वाचा-हा व्हिडियो पाहिल्यावर अंगावर शहारे येतील; दिग्गज खेळाडू म्हणाला, Thank you विराट!

ओव्हल मैदानावर झालेल्या चौथ्या कसोटीत विजयानंतर विराट कोहलीने इंग्लंडच्या बार्मी आर्मीला ट्रोल केले. विराटच्या या कृतीवर सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जण त्याच्या या कृतीला क्लासलेस तर काही जण त्याचे समर्थन करत आहेत.

वाचा- रोहित शर्मा पाचवी कसोटी खेळणार की नाही? दुखापतीबद्दल स्वत: दिले अपडेट

वाचा- विराट आणि शास्त्रींनी BCCIची शरमेने मान खाली घातली; मोठी कारवाई होणार

इंग्लंडच्या पराभवानंतर बार्मी आर्मीला टार्गेट करत विराटने विजयाचा जल्लोष केला. यावर इंग्लिश फॅन, पत्रकार आणि अन्य लोकांनी विराटवर निशाना साधला. त्यांनी विराटची ही कृती क्लासलेस असल्याचे म्हटले.

वाचा- टीम इंडियाने इतिहास घडवला; ५० वर्षातील पहिला विजय आणि इतके सारे विक्रम

डेली मेलचे क्रिकेट पत्रकार लॉरेंस बुथ यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मजा आली. भारतीय संघातील खेळाडू जल्लोष करत होते. पण विराटने इंग्लंडच्या चाहत्यांना टार्गेट करण्याची संधी सोडली नाही. या ट्विटनंतर त्यांनी आणखी एक ट्विट केले. मी गोधळ दूर करू इच्छितो. ही गोष्ट मला आवडली नाही. एक आघाडीचा खेळाडू ज्याने प्रतिस्पर्धी संघाचा दारुण पराभव केला. पण तो चाहत्यांसोबत पंगा घेऊ इच्छितो.

वाचा- पाकिस्तानला मागे टाकात टीम इंडिया अव्वल स्थानी; पाहा ताजा WTC गुणतक्ता

बार्मीआर्मीने देखील विराटचा फोटो शेअर करत त्याला टोला मारला आहे. आम्हाला माहिती आहे की तुला आर्मीमध्ये यायचे आहे. आम्हाला त्याचा इशाला मिळालाय.

इंग्लंडला चौथ्या डावात ३६८ धावांचे लक्ष्य मिळाले होते. सलामीच्या जोडीने १०० धावांची भागिदारी केली होती. पण भारताच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत त्यांना २१० वर ऑलआउट केला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या २-१ने पुढे असून टीम इंडिया ही मालिका गमावणार नाही.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: