परळी सुन्न आहे, राज्याची मान खाली गेलीय; पंकजा मुंडेंच्या नव्या ट्वीटची चर्चा


हायलाइट्स:

  • करुणा शर्मा यांच्यावरील कारवाईनंतर बीडमध्ये राजकारण तापलं
  • पंकजा मुंडे यांनी केलं सूचक ट्वीट
  • राज्याची मान खाली गेलीय – पंकजा मुंडे

बीड: माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या नव्या ट्वीटमुळं चर्चेला उधाण आलं आहे. ‘परळी सुन्न आहे. राज्याची मान खाली गेली आहे,’ असं ट्वीट पंकजा यांनी केलं आहे. करुणा शर्मा यांच्यावरील पोलीस कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या या ट्वीटचा रोख सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडंच असल्याचं बोललं जात आहे.

धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणा शर्मा यांनी उघडलेल्या आघाडीमुळं सध्या बीडचं राजकीय वातावरण तापलं आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात आपल्याकडं पुरावे असून ते पत्रकार परिषदेत देणार असल्याचं करुणा शर्मा यांनी काल जाहीर केलं होतं. हे पुरावे जाहीर करण्यासाठी करुणा शर्मा परळीत आल्या असता काही महिलांनी त्यांना घेराव घातला व धनंजय मुंडे यांच्या बदनामीबाबत जाब विचारला. त्यावेळी शाब्दिक चकमक झाली. करुणा शर्मा यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप दोन महिलांनी केला. त्यावरून पोलिसांनी करुणा शर्मा यांना ताब्यात घेतले. त्याचवेळी त्यांच्या गाडीत पिस्तूल मिळाले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.

वाचा: महाविकास आघाडीमागे ईडीचा ससेमिरा; पवारांचा सत्ताधाऱ्यांना गर्भित इशारा

या सगळ्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी ट्वीट केलं आहे. ‘चुकीचे लोक शक्तिशाली असल्यामुळंच अन्याय होतो असं नाही. पराक्रमी हात बांधून बसतात म्हणूनही अन्याय होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणीही आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये. चुकीचा पायंडा पडू नये, ही काळाची गरज आहे,’ असं पंकजा यांनी म्हटलं आहे. ‘परळी सुन्न आहे, राज्याची मान खाली गेली आहे,’ असं पंकजा यांनी पुढं म्हटलं आहे.
वाचा: मोहन भागवतांनी सांगितला हिंदू शब्दाचा अर्थ; शरद पवार म्हणाले…

कोण आहेत करुणा शर्मा?

रेणू शर्मा या महिलेनं धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या फसवणुकीच्या व बलात्काराच्या आरोपांनंतर करुणा शर्मा हे नाव प्रथम समोर आलं होतं. करुणा आणि रेणू शर्मा या दोघी बहिणी आहेत. करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्यापासून दोन मुलं आहेत. खुद्द मुंडे यांनीच काही दिवसांपूर्वी ही कबुली दिली होती. मात्र, रेणू शर्मा यांनी केलेले बलात्काराचे आरोप त्यांनी खोडून काढले होते. रेणू शर्मा यांच्याबद्दल इतर नेत्यांच्याही तक्रारी आल्या होत्या. त्यामुळं त्यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात केलेली तक्रार मागे घेतली होती. त्यानंतर हे प्रकरण शांत झालं होतं.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: