उत्तर कोरियात खाद्यान्न संकट; दोन महिन्याचा अन्नधान्य साठा, महागाईचा आगडोंब


प्योंगयांग: करोना महासाथीच्या संकटात उत्तर कोरियावर खाद्यान्न टंचाईचे सावट आहे. उत्तर कोरियामध्ये फक्त दोन महिने पुरेल इतकाच अन्नधान्य साठा उपलब्ध आहे. अन्नधान्याच्या टंचाईमुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे. देशात एका चहाची किंमत ५१०० रुपये इतकी झाली आहे. तर, कॉफीचा दर ७३०० रुपये इतका झाला आहे.

करोनाच्या संकटामुळे आधीच निर्बंध झेलत असलेल्या उत्तर कोरियाचे कंबरडे मोडले आहे. उत्तर कोरियाने करोना महासाथीच्या आजारापासून वाचण्यासाठी चीनला लागून असलेली आपली सीमा बंद केली आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा होणे थांबले आहे. तर, यावर्षी आलेल्या समुद्री वादळामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्तर कोरियातील कृषी उत्पादन ठप्प झाले आहे. या दुहेरी संकटामुळ उत्तर कोरियात फक्त दोन महिने पुरेल इतकाच धान्य साठा उपलब्ध आहे.

वाचा: अमेरिकेसोबत दोन हात करण्याची तयारी ठेवा; किम जोंग यांचे आदेश

महागाईचा आगडोंब

खाद्यान्न टंचाईमुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे. या संकटाच्या दरम्यान लोकांना १९९० च्या दशकातील सारख्या दुष्काळाची भीती सतावत आहे. उत्तर कोरियामध्ये जवळपास भुकेमुळे ३० लाख जणांना प्राण गमवावे लागले होते. उत्तर कोरियात सध्या साखर, तेल आणि पीठाचा तुटवडा जाणवत आहे. त्याशिवाय तांदूळ आणि इंधनाचा पुरवठाही विस्कळीत आहे.

वाचा: फिटनेस की प्रकृती खालावली? किम जोंग ‘या’ कारणाने पुन्हा चर्चेत!

वाचा: ‘हे’ संगीत म्हणजे कर्करोग, गाणं ऐकल्यास १५ वर्षांचा तुरुंगवास; किम यांचा आदेश
उत्तर कोरियाचे राष्ट्रपती किम जोंग उन यांनी याआधीच देशावर दुष्काळाचे सावट असून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याशिवाय नागरिकांच्या मदतीसाठी वर्कर्स पार्टीच्या सदस्यांनी पुढे येण्याचे आदेश दिले होते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: