चौथ्या कसोटीनंतर भारतीय खेळाडूंची झाली करोना चाचणी; असा आहे रिपोर्ट


लंडन: इंग्लंडविरुद्ध ओव्हल मैदानावर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दरम्यान भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य तीन सपोर्ट स्टाफ यांना कोरनाची लागण झाली. या सर्वांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. मुख्य प्रशिक्षकांना करोनाची लागण झाल्याने भारताच्या सर्व खेळाडूंची करोना चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट आला आहे.

वाचा- विराट आणि शास्त्रींनी BCCIची शरमेने मान खाली घातली; मोठी कारवाई होणार

गेल्या आठवड्यात मुख्य कोच रवी शास्त्री यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सर्वजनिक ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमातून शास्त्रींना करोनाची लागण झाली असावी. त्यांना करोनाची लक्षणे जाणवल्यावर लेटरल फ्लो टेस्ट करण्यात आली. त्याचा रिपोर्ट रविवारी पॉझिटिव्ह आला. शास्त्रींच्या संपर्कात आलेल्या तीन सपोर्ट स्टाफ सदस्यांना आयसोलेट करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित तिघांचा रिपोर्ट सोमवारी पॉझिटिव्ह आला. इंग्लंडविरुद्धची चौथी कसोटी झाल्यानंतर भारतीय संघातील सर्व खेळाडूंची करोना चाचणी करण्यात आली. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे या सर्वांची चाचणी नेगेटीव्ह आली आहे.

वाचा- टीम इंडियाने इतिहास घडवला; ५० वर्षातील पहिला विजय आणि इतके सारे विक्रम

शास्त्रींसोबत भारतीय संघाचे गोलंदाजीचे कोच भरत अरुण, फिजिओ नितिन पटेल आणि फिल्डिंग कोच आर श्रीधरन यांची आरटी-पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. शास्त्रींसह या सर्वांना १० दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

वाचा- पाकिस्तानला मागे टाकात टीम इंडिया अव्वल स्थानी; पाहा ताजा WTC गुणतक्ता

भारताने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत १५७ धावांनी विजय मिळून पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे. पहिली कसोटी पावसामुळे ड्रॉ झाली होती. त्यानंतर लॉर्ड्सवर भारताने विजय मिळवला. तिसऱ्या कोसटी इंग्लंडने बाजी मारली आणि मालिकेत बरोबरी केली होती.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: