Coronavirus: करोनाबाधितांची दिवसाची संख्या ३१ हजारांवर तर २९० जणांचा मृत्यू


हायलाइट्स:

  • एका दिवसात १५ लाख २६ हजार ०५६ नमुन्यांची करोना चाचणी
  • केरळमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद
  • केरळचा पॉझिटिव्हिटी दर अजूनही चिंताजनक

नवी दिल्ली : देशाला असलेला करोना संक्रमणाचा धोका अद्याप क्षमलेला नाही. देशात गेल्या २४ तासांत ३१ हजार २२२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर २९० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ३० लाख ५८ हजार ८४३ वर पोहचलीय. तर देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख ४१ हजार ०४२ वर पोहचलीय.

जवळपास ४ लाख जणांवर उपचार सुरू

आज (शुक्रवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात सोमवारी (६ सप्टेंबर २०२१) ४२ हजार ९४२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. करोनावर मात करणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी २२ लाख २४ हजार ९३७ वर पोहचलीय. तर देशात सध्या ३ लाख ९२ हजार ८६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Nipah Virus: केरळमध्ये निपाहची दहशत, २० जण रुग्णालयात; इतर राज्यांनाही सतर्कतेचा इशारा
PM Narendr Modi: करोनाविरुद्ध लढाईत पंतप्रधान मोदींनी ‘या’ राज्याला म्हटलं ‘चॅम्पियन’!

केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण

उल्लेखनीय म्हणजे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत केरळमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद होताना दिसून येतेय. केरळमध्ये गेल्या २४ तासांत १९ हजार ६८८ रुग्ण आढळून आलेत. तर २८ हजार ५६१ रुग्णांनी करोनावर माक केलीय. राज्यात १३५ मृत्यूंची नोंद करण्यात आलीय. राज्याचा पॉझिटिव्हिटी दर अजूनही १६.७१ टक्क्यांवर आहे.

  • एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : ३ कोटी ३० लाख ५८ हजार ८४३
  • एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : ३ कोटी २२ लाख २४ हजार ९३७
  • उपचार सुरू : ३ लाख ९२ हजार ८६४
  • एकूण मृत्यू : ४ लाख ४१ हजार ०४२
  • करोना लसीचे डोस दिले गेले : ६९ कोटी ९० लाख ६२ हजार ७७६


भारतात पार पडलेल्या चाचण्या

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर २०२१ पर्यंत देशात एकूण ५३ कोटी ३१ लाख ८९ हजार ३४८ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. यातील १५ लाख २६ हजार ०५६ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात करण्यात आली.

लसीकरण मोहीम

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण ६९ कोटी ९० लाख ६२ हजार ७७६ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील १३ लाख ५३ हजार ५७१ लसीचे डोस सोमवारी एका दिवसात देण्यात आले आहेत.

Karnal Kisan Mahapanchayat: हरयाणात खट्टर सरकारकडून आंदोलक शेतकऱ्यांच्या अडवणुकीचा प्रयत्न
rahul gandhi : शेतकरी आंदोलनाचा जुना फोटो शेअर केल्याने राहुल गांधी फसले; ‘राहुल गांधी भारतीय राजकारणातील राजकीय कुक्कू’, भाजपची टीकाSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: