Kerala: ऑनलाईन मित्रासाठी अल्पवयीन मुलीनं घरातून गायब केलं ७५ तोळे सोनं!


हायलाइट्स:

  • घरातून ७५ तोळे सोनं गायब
  • ऑनलाईन मित्राला २७ तोळे सोनं दिलं
  • उरलेलं सोनं कुठे गेलं? पोलिसांचा तपास सुरू

तिरुअनंतपुरम : केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. या घटनेमुळे तपास करणारे पोलीस अधिकारीही चक्रावलेत. संबंधित प्रकरणात एका दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीनं सोशल मीडियावर झालेल्या मैत्रीसाठी घरातून तब्बल ७५ तोळे सोनं गायब केलंय. बाजारभावानुसार, या सोन्याची किंमत जवळपास ३७ लाख रुपयांच्या आसपास असू शकते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोना संक्रमणाच्या काळात शिबीन नावाच्या एका व्यक्तीनं सोशल मीडियावर आपण आर्थिक अडचणीत असल्याची पोस्ट टाकली होती. ही पोस्ट पाहिल्यानंतर संबंधित अवघ्या १५ वर्षांच्या शालेय विद्यार्थीनीनं त्याच्याशी सोशल मीडियावरून संपर्क साधला. शिबीनशी काही संवादानंतर या मुलीन त्याची मदत करण्याचा निर्णय घेतला.

इथपर्यंत विद्यार्थीनीचा हेतू योग्य होता. परंतु, ऑनलाईन मित्राच्या मदतीसाठी मुलीनं चुकीचा मार्ग निवडला. आपल्याच घरात पालकांनी गुप्त ठेवलेलं सोनं त्यांच्या नकळत काढून मित्राला दिल्याचं पोलीस तपासात या मुलीनं मान्य केलंय.

विद्यार्थीनीच्या घरात बेडरुममध्ये गुप्त पद्धतीनं हे सोनं ठेवण्यात आलं होतं. परंतु, अचानक सोनं गायब झाल्यानंतर विद्यार्थीनीच्या आईनं पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी शिबीन आणि त्याची आई शाजिला यांना अटक केली.

भर रस्त्यात महिलेचं नाक कापलं; मुख्यमंत्र्यांच्या नावे फेसबुक पोस्ट लिहित पीडितेची आत्महत्या
https://maharashtratimes.com/india-news/covid-19-vaccine-how-to-identify-fake-vaccine-centre-issues-guidlines-for-covishield-covaxin-and-sputnik-v/articleshow/85947221.cms

विद्यार्थीनीच्या चौकशीत तीनं जवळपास वर्षभरापूर्वी तीनं शिबीनला सोनं दिल्याचं मान्य केलं. आईच्या मदतीनं शिबीननं हे सोनं विकलं. त्यांनी आपल्या घराचं कामही करून घेतलं तसंच उरलेले ९.८ लाख रुपयांची रोख रक्कम आपल्या घरात ठेवली. पोलिसांनी शिबीनच्या घरातून हे पैसे जप्त केलेत.

परंतु, याच दरम्यान या प्रकरणानं वेगळं वळण घेतलं. शिबीनच्या चौकशीत विद्यार्थीनीनं त्याला ७५ तोळे सोनं दिलंच नसल्याचं समोर आलं. शिबीनला केवळ २७ तोळे सोनं मिळालं होतं. हे समजल्यानंतर पोलिसांनी पुन्हा विद्यार्थीनीची चौकशी केली तेव्हा तीनं ४० तोळे सोनं पलक्कड जिल्ह्यातील दुसऱ्या एका तरुणाला दिल्याचं मान्य केलं. या तरुणाशी आपली ओळख ‘इन्स्टाग्राम‘द्वारे झाल्याचंही मुलीनं म्हटलं. मात्र, सोनं मिळाल्यानंतर या तरुणानं इन्स्टाग्रामवर आपल्याला ब्लॉक केल्याचं विद्यार्थीनी सांगत असली तरी पोलीस मात्र यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. पोलीस विद्यार्थीनीची आणखीन तपासणी करत आहेत.

सोबतच, एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं घरात का ठेवलं होतं? याचं उत्तरही विद्यार्थीनीची आई पोलिसांना देऊ शकली नाही. तसंच गेल्या वर्षभरापासून आपल्या घरातून ७५ तोळे सोनं गायब असल्याचंही तिच्या आईच्या लक्षात कसं आलं नाही? असाही प्रश्न पोलिसांना पडलाय.

संघाची तालिबानशी तुलना : ‘जावेद अख्तर यांना अफगाणिस्तानात पाठवा’
afghan refugees : ‘कुठल्याही अफगाण नागरिकाला गृह मंत्रालयाच्या मंजुरीशिवाय भारत सोडण्यास सांगितलं जाणार नाही’

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: