संघाची तालिबानशी तुलना : ‘जावेद अख्तर यांना अफगाणिस्तानात पाठवा’


हायलाइट्स:

  • विहिंप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आंदोलन
  • रस्त्यात जावेद अख्तर यांचा पुतळा जाळला
  • ‘अशा लोकांना देशात राहण्याचा कोणताही हक्क नाही’

शाहजहांपूर, उत्तर प्रदेश : ज्येष्ठ गीतकार आणि विचारवंत जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विचारांची तुलना तालिबानशी केल्यानंतर एक नवा वाद उभा राहिलाय. उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये याविरोधात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अख्तर यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. यावेळी नाराज विहिंप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर जावेद अख्तर यांचा पुतळा जाळला आणि जोरदारा घोषणाबाजी केली. यावेळी, ‘आरएसएसची तुलना तालिबानशी करणाऱ्या जावेद अख्तर यांना विमानानं अफगाणिस्तानात धाडलं पाहिजे’ असं म्हणत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला.

javed akhtar rss : ‘जावेद अख्तरांची पाळंमुळं दुबईत, RSS ला धोका समजतात’
afghan refugees : ‘कुठल्याही अफगाण नागरिकाला गृह मंत्रालयाच्या मंजुरीशिवाय भारत सोडण्यास सांगितलं जाणार नाही’

जावेद अख्तर यांचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे शेकडो कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. त्यांनी एका कापडी पुतळ्यावर जावेद अख्तर यांचा फोटो चिपकावला आणि जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर विहिंप कार्यकर्त्यांनी रोडवरच वाहतूक थांबवून गोंधळही घातला.

जावेद अख्तर यांनी आरएसएसची तुलना तालिबानशी केलीय. हे अत्यंत लज्जास्पद आहे. अशा लोकांना विमानात बसवून अफगाणिस्तानात धाडायला हवं. अशा लोकांना देशात राहण्याचा कोणताही हक्क नाही, असं म्हणतानाच जावेद अख्तर यांच्याविरोधात सरकारनं कारवाई केली नाही तर कार्यकर्ते आपल्या पद्धतीनं या वक्तव्याशी निपटेल, अशी धमकीही विहिंप कार्यकर्त्यांनी दिलीय.

भर रस्त्यात महिलेचं नाक कापलं; मुख्यमंत्र्यांच्या नावे फेसबुक पोस्ट लिहित पीडितेची आत्महत्या
Karnal Kisan Mahapanchayat: हरयाणात खट्टर सरकारकडून आंदोलक शेतकऱ्यांच्या अडवणुकीचा प्रयत्न

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: