अमेरिका विकसित करणार करोनाविरोधात औषधी गोळ्या; अब्जावधींची तरतूद


वॉशिंग्टन: करोनाला रोखण्यासाठी अमेरिकेमध्ये विषाणूविरोधी गोळी बनविण्यात येत आहे. त्यासाठी ३.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक अमेरिका करणार आहे. संशोधन योग्य प्रकारे झाले, तर या वर्षअखेर या गोळ्या बाजारात दाखल होतील. या गोळ्यांमुळे करोनाच्या संसर्गाला रोखण्याच्यादृष्टीने मोठे यश हाती येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी निधीची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, या निधीतून विविध औषधांच्या क्लिनिकल चाचणींला वेग देण्यात येणार आहे. करोनाचा विषाणू एखाद्याला गंभीर आजारी करण्याआधीच या औषधी गोळ्यांमुळे त्याचा खात्मा करू शकतो. जाहीर करण्यात आलेल्या ३.२ अब्ज डॉलरपैकी ५० कोटी अब्ज हे संशोधन आणि विकास व एक अब्ज डॉलर प्री क्लिनिकल चाचणी आणि क्लिनिकल चाचणीसाठी वापरण्यात येणार आहे. तर, ७० कोटी डॉलर हे औषध उत्पादनासाठी करण्यात येणार आहे.

वाचा: ब्रिटनमध्ये डेल्टा वेरिएंटचा हाहा:कार; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा

गोळीसाठी संशोधन

विषाणूविरोधी गोळीच्या संशोधनासाठी दोन ते तीन टप्प्यांत निधी मिळण्याची शक्यता आहे. ट्रम्प प्रशासनाच्या ‘ऑपरेशन वॉर्प स्पीड’अंतर्गत लशींच्या प्रकल्पामध्ये मोठा निधी गुंतला होता. तोंडावाटे देण्यात येणारी औषधे तुलनेने साठविण्यास सोपी आणि रुग्णांना स्वत:ला घेताही येतील, अशी असल्याने त्यावरही संशोधन सुरू झाले.

वाचा: चिंता वाढली! डेल्टानंतर आता ‘या’ नव्या वेरिएंटचा धोका; २९ देशांमध्ये फैलाव

गोळीची पार्श्वभूमी

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांचा कोव्हिडविरोधी गोळी प्रकल्पाच्या संशोधनाला पाठिंबा आहे. ‘एचआयव्ही’वरील गोळ्यांच्या संशोधनामध्ये डॉ. फाउची यांचा मोठा वाटा होता. २०००च्या दशकात सुरुवातीला ‘सोफोसब्विर’ गोळ्यांनी हिपॅटिटीस सी पूर्णपणे बरा होतो, असे संशोधकांना आढळले. ‘इन्फ्लुएन्झा’वरील टॅमी फ्लू गोळीही प्रभावी. कोव्हिडच्या सुरुवातीच्या काळात तिचा वापर करण्यात आला होता. ‘इबोला’वर उपयुक्त असणाऱ्या ‘रेमडेसिव्हिर’ या एकाच औषधाला कोव्हिडवरील उपचारांसाठी अमेरिकेमध्ये गेल्या वर्षी पहिल्यांदा मंजुरी देण्यात आली होती. भारतातही याचा वापर मोठ्या प्रमाणात झाला.

वाचा: करोनामुळे भारत उद्धवस्त, चीनने भरपाई द्यावी; ट्रम्प यांची मागणी

करोनासाठी गोळीची गरज का?

एचआयव्ही, हिपॅटायटिस सी यांसारख्या आजारांवरही गोळी उपलब्ध असताना कोव्हिडवर वर्षभराहून अधिक काळ लोटल्यानंतरही प्रभावी गोळी उपलब्ध नाही. वाहतुकीस सोयीचे, साठा करण्यास उपयुक्त यांमुळे कोव्हिडवर प्रभावी गोळी उपलब्ध झाली, तर ती रुग्णांच्या फायद्याची ठरेल. यामुळे आजाराची तीव्रता कमी होऊन रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ येणार नाही, असे मानले जाते.

वाचा: ‘चीनमधून नव्हे तर अमेरिकेतून झाला करोनाचा फैलाव’
अमेरिकी प्रशासनाची तयारी

विक्रमी वेळेत अमेरिकेत लसीकरण पूर्ण होणार असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेत युद्धपातळीवर लसीकरण सुरू आहे. अठरा अब्ज डॉलरची त्यासाठी योजना. याच योजनेंतर्गत नव्या कार्यक्रमाची अमेरिकेच्या आरोग्य विभागाने घोषणा केली. करोनाच्या लढ्यामध्ये यापूर्वीच ‘मर्क’च्या दीड लाख रेजिमेन्सची खरेदीची तयारी. त्याला आणीबाणीच्या वापरासाठी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. आजार टाळण्यासाठी १९ थेरपिक एजंटच्या चाचणीला प्राधान्य देण्यात येणार आहे.

वाचा: चिंता वाढली? जगातील ५९ प्रयोगशाळांमध्ये घातक विषाणूंवर संशोधन, सुरक्षा अपुरी!

‘संशोधन मोलाचे ठरेल’

अमेरिकी अध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार अँथनी फाउची यांनी सांगितले, ‘नव्या विषाणूविरोधी औषधांमुळे कोव्हिड आजार गंभीर होणार नाही आणि त्यामुळे होणारे मृत्यूही रोखले जातील. विषाणूविरोधी गोळ्या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात घरीही घेता येतील आणि करोनाशी लढण्यामध्ये अशा प्रकारचे संशोधन मोलाचे ठरेल.’Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram