afghan refugees : ‘कुठल्याही अफगाण नागरिकाला गृह मंत्रालयाच्या मंजुरीशिवाय भारत सोडण्यास सांगितलं जाणार नाही’


नवी दिल्लीः भारतात राहणाऱ्या अफगाण नागरिकांना गृह मंत्रालयाच्या परवानगीशिवाय देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. भारतात येणाऱ्या अनेक अफगाण नागरिकांना आपल्या देशातील नव्या सत्ताधीशांची भीती आहे. गृह मंत्रालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय परराष्ट्र क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाद्वारे (एफआरआरओ) कोणत्याही अफगाण नागरिकाला भारत सोडण्यास सांगितलं जाणार नाही. अशा प्रकारची प्रकरणं एफआरआरओ गृहमंत्रालयाकडे पाठवेल, असं अधिकाऱ्याने सांगितलं. अफगाणिस्तानच्या महिला खासदार रंगीना कारगर यांच्याकडे वैध कागदपत्र असूनही दिल्लीच्या आयजीआय विमानतळावरूनच इस्तंबुलला पाठवण्यात आलं. यानंतर हे आदेश दिले गेले.

अफगाणिस्तानसह सर्व देशांचे भारतात राहणाऱ्या नागरिकांचा व्हिसा निःशुल्क आधारावर ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा करण्यापूर्वी अफगाण नागरिक भारतात सहा महिन्यांहून अधिक काळापासून आणि तर अनेक नागरिक २०२० च्या पहिल्या लॉकडाउनच्या घोषणेपासून भारतात राहात आहेत.

javed akhtar rss : ‘जावेद अख्तरांची पाळंमुळं दुबईत, RSS ला धोका समजतात’

केंद्र सरकारने ई व्हिसा किंवा थांबण्याचा कालावधी कुठल्याही अटीशिवाय ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. यामुळे विदेशी नागरिकांना एफआरआरओकडे व्हिसा वाढवण्यासाठी अर्ज करण्याची गरज पडणार नाही. आता देश सोडण्यासाठी त्यांना आधी परवानगीसाठी अर्ज करावा लागेल. तसंच एफआरआरओ कुठल्याही दंडाशिवाय त्यांना मंजुरी देईल. अनेक अफगाण नागरिकांना तालिबानची भीती आहे. यामुळे त्यांनी भारतात राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

congress news : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १३० जागा मिळणार! पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: