भारतासाठी हा खेळाडू ठरला लकी, संघात आला आणि भन्नाट कामगिरीसह विजय मिळवून दिला…


लंडन : भारताने चौथ्या सामन्यात इंग्लंडवर दमदार विजय साकारला आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. पण या पाचव्या सामन्यात भारताच्या एका खेळाडूने दोन्ही डावांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
भारताचा हा खेळाडू आहे तरी कोण, पाहा…
या सामन्यात भारताचा एक खेळाडू संघात आला आणि त्याने सामना जिंकवून दिल्याचे पाहायला मिळाले. हा खेळाडू आहे शार्दुल ठाकूर. शार्दुल हा फक्त वेगवान गोलंदाज आहे, असे सर्वांना वाटत होते. पण या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शार्दुलने अर्धशतकं झळकावली आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. जिथे भारताने फलंदाज अपयशी ठरत होते, तिथे शार्दुलने दोन्ही डावांत संघाला गरज असताना धडाकेबाज खेळी साकारल्या आणि दोन्ही डावांत अर्धशतकं झळकावणारा तो भारताचा एकमेव तळाचा फलंदाज ठरला. शार्दुलने यावेळी भारताच्या मार्गात अडरस बनू शकणाऱ्या जो रुटला दुसऱ्या डावात लवकर बाद केले आणि त्यानंतरच भारतीय संघाला विजयाची आशा निर्माण झाली. शार्दुलने भेदक गोलंदाजीही करत विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळे भारतासाठी यावेळी सर्वात उपयुक्त खेळाडू हा शार्दुल ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण शार्दुलने पहिल्या डावात एक आणि दुसऱ्या डावात दोन बळी मिळवले. त्यामुळे एका सामन्यात दोन अर्धशतक आणि तीन बळींसह शार्दुलने सर्वोत्तम कामिगिरी केल्याचे पाहायला मिळाले.

भारताने इंग्लंडला धूळ चारत १५७ धावांनी दमदार विजय साकारला. या विजयासह भारताने या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघाला आता ही मालिका गमावण्याची भिती नक्कीच नसेल. कारण चार सामन्यांमध्ये आता भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताने पाचवा सामना गमावला तरी त्यांना मालिका गमवावी लागणार नाही, या परिस्थितीत मालिका २-२ अशी बरोबरीत सुटू शकते. त्याचबरोबर अखेरचा आणि पाचवा सामना अनिर्णीत राहीला तर भारतीय संघ ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकू शकते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: