भर रस्त्यात महिलेचं नाक कापलं; मुख्यमंत्र्यांच्या नावे फेसबुक पोस्ट लिहित पीडितेची आत्महत्या


हरदोईः उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील माधौगंजमधील एका महिलेने आपल्यावर बेतलेल्या भयंकर प्रसंगानंतर आत्महत्या केली आहे. पण आत्महत्येपूर्वी पीडित महिलेने फेसबुकवर मार्मिक पोस्ट लिहित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. माधौगंज पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

आत्महत्येपूर्वी महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता, असं पोलिस अधीक्षक अजयकुमार म्हणाले. दुसरीकडे पोलिसांवर झालेल्या आरोपांची आता चौकशी केली जात आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

आरोपी लवी याच्या छळाला कंटाळून आम्ही किडवई नगर भागात भाड्याने घर घेतलं. पत्नी आणि मुलांसह तिथेच राहात होतो. आपण शनिवारी घरातून दुकानाकडे निघालो होतो. यादरम्यान आरोपी लवी हा घरात घुसला आणि ५० हजार रुपयांसह मोबाइल उचलून नेला. पत्नी रोली गुप्ताने विरोध केल्यावर आरोपी लवीने रोली गुप्ता यांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावलं, असं मृत महिलेच्या पतीने सांगितलं.

रोली गुप्ता या आपल्या तीन मुलांसह पोलिस स्टेशनला जात असताना आरोपी लवीने त्यांना रस्त्यात आडवलं आणि रोली गुप्ता यांना मारहाण सुरू केली. आरोपी लवीने रोली गुप्ता यांचे नाक कापले. यानंतर रोली गुप्ता या बेशुद्ध होऊन जागेवरच कोसळल्या. यानंतर महिलेच्या पतीने पोलिस ठाणं गाठलं. पण पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. तर पोलिसांनी त्यांना हवी तशी तक्रार लिहून घेतली, असं मतृ महिलेचे पती गुप्ता यांना सांगितलं.

nandkumar baghel : मुख्यमंत्र्यांच्या वडिलांविरोधात FIR दाखल, ब्राह्मणांविरोधात वक्तव्य भोवलं

पोलिसांनी कारवाई न केल्याने फेसबुकवर लिहिली पोस्ट

तक्रारीनंतर आरोपी लवीवर पोलिसांनी कुठलाही कारवाई केली नाही. यानंतर न्याय मागण्यासाठी पीडित महिलेने आत्महत्येपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावे फेसबुकवर पोस्ट लिहिली. यात त्यांनी संपूर्ण घटना सांगितली. यानंतर त्यांनी फाशी लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी मृतदेह ताब्यात घेतला.

पैसे उकळल्याचा आरोप, महिलेनं भररस्त्यात धरली भाजप नेत्याची गचोरी!

अपर पोलिस अधीक्षक करणार चौकशी

अपर पोलिस अधीक्षकांकडे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल. तसंच पोलिसांवरही आरोप झाले आहेत. याचीही चौकशी केली जाईल. या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे, असं पोलिस अधीक्षक अजयकुमार यांनी सांगितलं.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: