infosys panchajanya : इन्फोसिसविरोधात पांचजन्यमध्ये लेख; कोणतीही भारतीय कंपनी राष्ट्रविरोधी असू शकत नाहीः टी.व्ही. मोहनदास पै


नवी दिल्लीः इन्फोसिस ( Infosys ) कंपनी राष्ट्रविरोधी असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित पांचजन्य मासिकाच्या एका लेखातून करण्यात आला. पण या लेखातील ( Infosys Panchajanya Article ) विचार हे लेखकाचे व्यक्तिगत विचार आहेत, असं RSS कडून रविवारी स्पष्ट करण्यात आलं. आता Infosys चे माजी प्रमुख आर्थिक अधिकारी टी. व्ही. मोहनदास पै ( Tv Mohandas Pai ) यांनी यावर वक्तव्य केलं आहे. व्यवसायासाठी अशा प्रकारच्या राजनैतीक भाषेचा उपयोग केला जाऊ नये, असं पै म्हणाले. इन्फोसिस कंपनी नक्षलवादी, डावे आणि तुकडे-तुकडे गँगसोबत मिळून काम करत असल्याचा आरोप पांचजन्यमधील लेखातून करण्यात आला.

हा लेख काही विक्षिप्त लोकांनी लिहिला आहे आणि इन्फोसिस नेहमीच देशाच्या हितासाठी उभी राहणारी कंपनी आहे. आयकर विभागाची ई-फायलिंग पोर्टल युजर्सच्या अपेक्षेनुसार काम करत नाहीए. यावरून इन्फोसिसवर टीका करता येईल. पण देशविरोधी म्हणणं आणि कटात सामील असल्याचा आरोप करणं चुकीचं आहे, असं मोहनदास पै म्हणाले.

आपण एकजूट होऊन अशा मूर्ख विधानांवर टीका केली पाहिजे, असं आवाहन मोहनदास पै यांनी केलं. देशविरोधी शक्ती आयकर पोर्टल किंवा इन्फोसिसच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक हितांवर आघात करण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा सवाल पांचजन्यमधील लेखातून करण्यात आला होता.

infosys tax portal issue : ‘इन्फोसिसने नक्षलवाद्यांना मदत केली’, पांचजन्यमधील लेखातून आरोप; RSS ने लेखावरू

rahul gandhi : शेतकरी आंदोलनाचा जुना फोटो शेअर केल्याने राहुल गांधी फसले; ‘राहुल गांधी

इन्फोसिसची प्रतिष्ठा आणि आघात… या शिर्षकाखाली पांचजन्यमध्ये कवर स्टोरी छापण्यात आली होती. यावर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा फोटो छापलेला होता. इन्फोसिसवर नक्षलवाद्यांना आणि डाव्यांसह तुकडे-तुकडे गँगला मदत केल्याचा आरोप लेखातून करण्यात आला.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: