सलग तिसऱ्या दिवशी उच्चांकी दौड ; सेन्सेक्स आणि निफ्टीची आगेकूच सुरूच


हायलाइट्स:

  • आज सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ५८५१५.८५ अंकाचा नवा उच्चांकी स्तर गाठला.
  • सलग तिसऱ्या सत्रात सेन्सेक्सने मोठी वाढ नोंदवली.
  • पाठोपाठ राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७३५० अंकापर्यंत गेला.

मुंबई : गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदीचा सपाटा कायम ठेवल्याने आज सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ५८५१५.८५ अंकाचा नवा उच्चांकी स्तर गाठला. सलग तिसऱ्या सत्रात सेन्सेक्सने मोठी वाढ नोंदवली. पाठोपाठ राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७३५० अंकापर्यंत गेला.

बिटकॉइनमध्ये तेजी; गाठला पुन्हा ५० हजार डॉलर्सचा टप्पा, इथेरियमची दमदार कामगिरी
आजच्या तेजीचे नेतृत्व रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने केले. इंट्राडेमध्ये रिलायन्सचा शेअर ३ टक्क्यांपर्यंत वाढला होता. सेन्सेक्समधील ३० पैकी १३ शेअर तेजीसह बंद झाले. तर १७ शेअरमध्ये घसरण झाली. आज आयटी सेवा क्षेत्रातील शेअरला देखील मागणी दिसून आली. एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा यांच्यासह बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, एचयूएल, एल अँड टी, ऍक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी, टीसीएस, डॉ. रेड्डी लॅब या शेअरमध्ये वाढ झाली.

‘एनसीडी’ मध्ये गुंतवणूक संधी; इंडेल मनीचे ५०० कोटींचे अपरिवर्तनीय रोखे
दुसऱ्या बाजुला बजाज फिनसर्व्ह, नेस्ले, एसबीआय, बजाज फायनान्स, एनटीपीसी, मारुती, भारती एअरटेल, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट, पॉवरग्रीड, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक या शेअरमध्ये घसरण झाली.

आर्थिक उद्धीष्ट्ये आणि जीवन विमा संरक्षण ; एक्साइड लाईफची गॅरंटीड वेल्थ प्लस योजना
आज बीएसई रियल्टी इंडेक्समध्ये सर्वाधिक २.९७ टक्के वाढ झाली. ज्यात प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट्स या शेअरमध्ये १० टक्के वाढ झाली. त्याशिवाय ओबेराय रियल्टी, शोभा, ब्रिगेड इंटरप्राइस, सनटेक रियल्टी, गोदरेज प्रॉपर्टीज या शेअरमध्ये वाढ झाली. बीएसई ऑइल अँड गॅस इंडेक्स ०.६६ टक्के घसरण झाली.

बाजार बंद होताना सेन्सेक्स १६६ अंकाच्या वाढीसह ५८२९६ अंकावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५४ अंकाच्या वाढीसह १७३७७ अंकावर बंद झाला. आज आयआरसीटीसीच्या शेअरने पहिल्यादाच ३००० रुपयांचा टप्पा ओलांडला. आयरसीटीसीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारला.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: