मुंबईकरांमध्ये मलेरिया, डेंग्यूचा ताप वाढला; पालिकेनं केली ड्रोनद्वारे फवारणी


हायलाइट्स:

  • मुंबईत डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांची वाढ
  • रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढती
  • पालिकेनं सुरू केल्या उपाययोजना

मुंबईः मुंबईत करोनाची साथ आटोक्यात येत असताना मलेरियाडेंग्यू या साथीच्या रोगांनी डोकं वर काढलं आहे. रुग्णालयांमध्ये आता पावसाळी आजारांच्या रुग्णांची गर्दी वाढती आहे. त्यासाठी पालिकेनं आज महालक्ष्मी धोबीघाट येथे ड्रोनद्वारे फवारणी केली आहे. त्यावेळी महापौर किशोरी पेडणेकर या उपस्थित होत्या.

मलेरिया व डेंग्यूंच्या डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी महालक्ष्मी धोबीघाट येथील नागरिकांच्या घराच्या छतांवर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली. जी /दक्षिण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात मोडकळीस आलेल्या मिल्स, लोअर परेल रेल्वे वर्कशॉपच्या ठिकाणी असणारे रूफ गटर, झोपडपट्टीच्या वरील भागात ठेवण्यात आलेल्या ताडपत्री अश्या ठिकाणी पावसाळांमध्ये पाणी साचून मलेरिया वाहक डासांची उत्पत्ति होत असते. या पाहणी करण्याकरीता व अळीनाशक फवारणी करण्याकरीता किटकनियंत्रण खात्याच्या कर्मचाऱ्यांना पोहोचता येत नसल्यामूळे सदर ठिकाणी डासउत्पत्ति होऊन मलेरिया रुग्णांमध्ये वाढ होते, अशी माहिती समोर आली होती.

डासांची उत्पतीस्थाने नष्ट करण्यासाठी स्थानिक आमदार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोन खरेदी करून ड्रोनच्या सह्याने जून-२०२१ पासून उपरोक्त ठिकाणी कीटकनाशक फवारणी करण्यात येत आहे. कीटकनियंत्रण खात्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत विभागामध्ये एकूण ६८९ एवढे मलेरियावाहक डास उत्पत्ति स्थाने शोधून नष्ट करण्यात आली आहेत.

संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करणार; त्या वक्तव्यामुळं भाजप आक्रमक

आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जी/ दक्षिण विभागातील सर्व वॉर्डमध्ये ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येणार आहे. मुंबईकरांचे आरोग्य चांगले रहावे हा आमचा प्रयत्न असून प्रत्येक वार्डला एक ड्रोन देण्याची मागणी नगरसेवकांनी केली असल्याचे महापौरांनी सांगितले. कमी पैशात जास्त परिणामकारकता यातून साध्य होत असल्यामुळे मलेरिया व डेंग्यूची रुग्णसंख्या निश्चितच कमी होण्यास यामुळे हातभार लागणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच नागरिकांनी आपल्या घरांमध्ये सुद्धा काळजी घेणे गरजेचे असून घरातील शोभिवंत कुंड्यांची तावदाने, वातानुकुलित यंत्रणांमधील टाक्यामध्ये पाणी साचून राहणार नाही, याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, असं आवाहनही महापौरांनी केलं आहे.

‘मी काय आहे ते तुमच्या बापाला जाऊन विचारा’; चित्रा वाघ यांचा थेट इशारा

दरम्यान, जी/दक्षिण विभागात गत वर्षी पावसाळा कालावधीमध्ये जून ते ऑगस्ट २०२० मध्ये एकूण ९०० मलेरिया रुग्ण सापडले होते. यावर्षी याच जून ते ऑगस्ट २०२१ कालावधीमध्ये मलेरिया रुग्णांमध्ये घट होऊन एकूण ४७४ मलेरिया रुग्ण सापडले आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: